For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युसेन बोल्ट नव्या पिढीचा आदर्श

06:45 AM Sep 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
युसेन बोल्ट नव्या पिढीचा आदर्श
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

जमैकाचा जागतिक दर्जाच्या सर्वात वेगवान धावपटू तसेच आठवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा युसेन बोल्ट हा भारताच्या नव्या पिढीतील धावपटूंचा आदर्श राहील.

येथे पुमा क्रीडा महोत्सवाला 30 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाला युसेन बोल्टला निमंत्रीत करण्यात आले. शुक्रवारी आयोजित केलेल्या पात्र फेरीच्या शालेय स्तरावरील ‘ड्रीम सेट गो’ या शर्यतीमध्ये 15 शहरातील सुमारे 400 स्कूलमधील 7 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. या शर्यतीचा अंतिम टप्पा मुंबईतील जमनाबाई नरसे स्कूल येथे 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. जागतिक दर्जाचा धावपटू युसेन बोल्टने अनेक युवा धावपटूंसमवेत आपली छायाचित्रे टिपली. तसेच 1 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या प्रदर्शनिय फुटबॉल सामन्यात तो मुंबई सीटीएफसी तसेच बेंगळूर एफसी संघाकडून सहभागी होणार आहे. हा प्रदर्शनिय सामना युवराज सिंग चॅरेटी फुटबॉल सामना म्हणून संबोधला जात आहे. युसेन बोल्टची ही दुसरी भारत भेट आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.