For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत

11:58 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत
Advertisement

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव

Advertisement

टी20 विश्वचषकात अमेरिकेनं सर्वात मोठा उलटफेर केला आहे. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानचा पराभव करत इतिहास रचला आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अमेरिकेचा संघही 159 धावांपर्यंतच पोहचू शकला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकाने सुपर ओव्हरमध्ये शानदार कामगिरी केली. सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद आमीर यानं वाईड चेंडू फेकले, हेच पाकिस्तानच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. अमेरिकाकडून सौरभ नेत्रावळकर यानं सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 19 धावांचा यशस्वी बचाव केला.  पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम यानं 44 धावांचे योगदान दिले. तर  शादाब खान याने 40 धावांची महत्वाची खेळी केली. अमेरिकाकडून नोशतुश केंजिगे याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.  160 धावांचा पाठलाग करताना अमेरिकासाठी कर्णधार मोनांक पटेल 50 आणि ओरान जोन्स यानं 35 धावांची खेळी केली. एंड्रीज गौस यानेही 26 चेंडूमध्ये झटपट 35 धावांचं योगदान दिले. पाकिस्तान आणि अमेरिका यांनी 159 धावा केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात शानदार राहिली. कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीवन टेलर यांनी संघाला शानदार सुरुवात दिली. सहाव्या षटकात टेलर 12 धावा काढून बाद झाला. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेने पहिल्या सहा षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 44 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मोनांकने डावाला आकार दिला. अमेरिकेने 10 षटकात 76 धावा केल्या होत्या.  मोनांक यानं एंड्रीज गौस याच्यासोबत डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्येर 68 धावांची महत्वाची भागिदारी झाली.  14 व्या षटकात  हॅरिस रौफ याने एंड्रीज गौस याला 35 धावांवर बाद करत पाकिस्तानचं कमबॅक केले. त्यानंतर मोहम्मद आमीर यानं जम बसलेल्या मोनांकला तंबूत पाठवले. अर्धशतकानंतर मोनांक बाद झाला. अमेरिकेला अखेरच्या पाच षटकात विजयासाठी 45 धावांची गरज होती. कॅनडाविरोधात शतक ठोकणारा आरोन जोन्स मैदानात होता. त्यानं पाकिस्तानच्या हातून सामना हिरावला. कारण, अखेरच्या दोन षटकात अमेरिकेला 21 धावांची गरज होती. मोहम्मद आमीर यानं 19 व्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. अखेरच्या षठका 15 धावांची गरज होती. पाकिस्तानकडून हॅरीस रौफ गोलंदाजीला आला. जोन्स यानं रौफच्या षटकात 14 धावा वसूल केल्या. त्यामुळे सामना टाय झाला.

Advertisement

सुपर ओव्हरमध्ये काय झालं ?

सुपर ओव्हरमध्ये अमिरेकाने प्रथम फलंदाजी केली. ओरान जोन्स यानं मोहम्मद आमिरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावाच करता आल्या. तिसऱ्या चेंडूवर सिंगल घेतली. मोहम्मद आमिर यानं पुढचा चेंडू वाईड फेकला. या वाईड चेंडूवर हरमीत सिंहने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर जोन्स यानं पुन्हा एक धाव घेतली. मोहम्मद आमिर यानं पुन्हा एकदा वाईड चेंडू फेकला. वाईड चेंडूवर दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर पुन्हा दोन धावा घेतल्या. सहावा चेंडू फेकण्याआधी आमिरने पुन्हा एक वाईड चेंडू फेकला. यावर पुन्हा दोन धावा घेण्यात आल्या. अखेरच्या चेंडूवर आमिरने एक धाव घेतली. सुपर ओव्हरमध्ये युएसएने 18 धावा केल्या.   पाकिस्तानला विजयासाठी 19 धावा मिळाल्या होत्या. अमेरिकाकडून नेत्रावळकर यानं गोलंदाजी केली. नेत्रावळकरने पहिला चेंडूवर निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमद यानं चौकार ठोकला. पुढचा चेंडू नेत्रावळकर यानं वाईड फेकला. पण पुढच्याच चेंडूवर इफ्तिखार बाद झाला. नेत्रावलकार याने वाइड फेकला. त्यानंतर पुढील चेंडूवर पाकिस्तानला लेग बायचा चौकार मिळाला. पाच्या चेंडूवर दोन धावा आल्या. अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला 19 धावा करता आल्या नाहीत.अमेरिकाने शानदार विजय मिळवला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

डावखुऱ्या सौरभ नेत्रावळकर याचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला.  कूचबिहार ट्रॉफीमध्ये 2008-09 त्यानं 6 सामन्यांत 30 बळी घेतले होते. त्यानंतर 2010 च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली.सौरभनं 22 डिसेंबर 2013 रोजी मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. फेब्रुवारी 2014 रोजी त्यानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं. त्यानंतर तो मुंबईसोबत विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला.

अंडर 19 च्या संघाचा सदस्य

2010 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभ नेत्रावळकर टीम इंडियाचा सदस्य होता. केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह तो भारतासाठी खेळला होता. 2010 अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघ प्लेऑफ फेरीतून बाहेर पडला. 2010 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभनं 6 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचचा इकॉनॉमी रेट 3.11 होता. सौरभशिवाय स्पर्धेतील इतर तीन खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, पण सौरभला मुकावं लागलं. यानंतर त्यानं रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला.   सौरभ हा व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्यानं मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. तो सध्या ‘ओरॅकल’ या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. त्याची लिंक्डइन प्रोफाईल सध्या चर्चेत आहे. जानेवारी 2018 मध्ये सौरभनं अमेरिकन संघात स्थान मिळवलं.

Advertisement
Tags :

.