अमेरिकेने युक्रेनची सैन्य मदत रोखली
झेलेंस्कीसोबतच्या वादाच्या 3 दिवसांनी ट्रम्प यांची घोषणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
व्हाइट हाउसमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर अमेरिकेने युक्रेनला देण्यात येणारी सर्व सैन्य मदत रोखण्याची घोषणा केली आहे. हा आदेश त्वरित प्रभावाने लागू झाला आहे. अमेरिकेकडून अद्याप युक्रेनला न पोहोचलेली सैन्यसामग्री देखील रोखण्यात आली आहे. यात पोलंडपर्यंत पोहोचलेले संरक्षण साहित्य देखील सामील आहे.
युक्रेनचे अध्यक्ष खरोखरच शांतता इच्छित आहेत याबद्दल ट्रम्प यांना जोवर विश्वास वाटत नाही तोवर ही रोखलेली मदत पूर्ववत केली जाणार नसल्याचे व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेचे समर्थन जोपर्यंत प्राप्त आहे तोवर शांतता प्रस्थापित व्हावी अशी झेलेंस्की यांची इच्छा नाही. झेलेंस्की यांनी केलेले वक्तव्य अमेरिका सहन करणार नाही असे सैन्य मदत रोखण्याच्या काही तासांपूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियार पोस्ट करत म्हटले होते.
कायमस्वरुपी स्थगिती नाही
युक्रेनची सैन्य मदत रोखण्यावर सध्या अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी कुठलीच टिप्पणी केलेली नाही. झेलेंस्की हे रशियासोबत शांतता प्रस्थापित करू इच्छितात की नाही याबद्दल ट्रम्प समीक्षा करत आहेत. ही मदत कायमस्वरुपी रोखण्यात आलेली नाही असे ट्रम्प प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर मागील बिडेन प्रशासनाने 20 जानेवारी रोजी फेब्रुवारी 2022 पासून युक्रेनला 65.9 अब्ज डॉलर्सची सैन्य मदत दिली असल्याचे म्हटले होते. या सैन्य मदतीत क्षेपणास्त्रांपासून भूसुरुंगांचा समावेश आहे. अमेरिकेच्या मदतीशिवया युक्रेनचा रशियासोबतचा संघर्ष 3 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणे अशक्य हेते.
8.7 हजार कोटी रुपयांची मदत रोखली
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे एक अब्ज डॉलर्सची (8.7 हजार कोटी रुपये) शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा संबंधी मदतीवर प्रभाव पडू शकतो. ही शस्त्रसामग्री लवकरच युक्रेनला पुरविली जाणार होती. युक्रेन केवळ अमेरिकन संरक्षण कंपन्यांकडून थेट नवे सैन्य हार्डवेअर खरेदी करण्यासाठी करू शकतो, अशाप्रकारची सैन्यसामग्री देखील रोखण्यात आाrल आहे. अमेरिकेचे सहाय्य रोखण्यात आल्यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्याकडुन कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हा निर्णय झेलेंस्की यांच्या वर्तनामुळे घेण्यात आला आहे. झेलेंस्की युद्ध समाप्त करण्यासाठी चर्चेचा प्रयत्न करत असतील तरच ही स्थगिती हटविली जाऊ शकते असे व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्याने नमूद पेले.
2-4 महिन्यांत दिसणार प्रभाव
अमेरिकेने मदत रोखण्याचा निर्णय घेतल्याने युक्रेनवर मोठा प्रभाव पडणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे युक्रेन जणू ‘अपंग’च झाला आहे. अमेरिकेची मदत थांबल्याने आता युक्रेनची निम्मी शक्ती संपुष्टात आली आहे. याचा प्रभाव दोन ते चार महिन्यांमध्ये दिसू लागले. सध्या युरोपीय देशांकडून मिळणाऱ्या सहाय्यामुळे युक्रेन काही काळापर्यंत संघर्षात तग धरू शकणार असल्याचा दावा सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे मार्क कॅन्सियन यांनी केला आहे.
गुप्तचर माहिती देणे बंद करणार
युक्रेनला आता कुठल्याही स्थितीत शांतता प्रस्ताव स्वीकारावा लागणार आहे. ट्रम्प प्रशासन युक्रेनला कमकुवत करण्यासाठी आणखी अनेक मार्ग अवलंबू शकते. यात गुप्तचर माहिती प्रदान करणे रोखण्याचा निर्णय सामील असू शकतो. तसेच युक्रेनच्या सैन्याला देण्यात येणारे प्रशिक्षण रोखून झेलेंस्की यांना तडजोड करण्यास भाग पाडले जाऊ शकते असे कॅन्सियन यांनी म्हटले आहे.
युक्रेनवरील परिणाम
अमेरिका युक्रेनला एक प्रमुख समर्थक राहिला आहे. मागील 3 वर्षांमध्ये रशियाच्या विरोधातील संघर्षात अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रs, दारुगोळा अन् आर्थिक सहाय्य केले आहे. ही मदत थांबल्याने युक्रेनच्या संरक्षण क्षमतेवर प्रभाव पडणार आहे. युक्रेनला स्वत:च्या भूभागावर नियंत्रण राखण्यास अडचण होऊ शकते. युक्रेनचे सैन्य अमेरिकेकडून मिळणारी शस्त्रास्त्रs, खासकरून तोफा, ड्रोन आणि क्षेपणास्त्र यंत्रणेवर बऱ्याचअंशी निर्भर राहिले आहे. या सामग्रीच पुरवठा रोखण्यात आल्याने युक्रेनला रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे अवघड ठरणार आहे. यामुळे रशिया युक्रेनच्या आणखी काही भूभागांवर कब्जा करू शकतो.