For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन नौदल हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग

07:00 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन नौदल हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग
Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकन नौदलाच्या एमएच-60एस सीहॉक हेलिकॉप्टरने बुधवारी अरबी समुद्रात आपत्कालीन जल-लँडिंग केले. या घटनेदरम्यान हेलिकॉप्टरमधील चार कर्मचाऱ्यांपैकी तिघांना सुखरूप वाचवण्यात आले, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. नौदलाकडून शोधमोहीम सुरू आहे. अमेरिकी नौदलाच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ या विमानवाहू जहाजावरून उड्डाण करत होते. आपत्कालीन लँडिंगनंतर वाचवण्यात आलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक तपासात हेलिकॉप्टरवर हल्ला झाल्याचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. अपघाताची परिस्थिती निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे अमेरिकी नौदलाने सांगितले. बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध सध्या सुरू असून भारतीय नौदलाची मदतही घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.