For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत, चीनच्या कंपन्यांवर अमेरिकेकडून मोठे निर्बंध

06:41 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत  चीनच्या कंपन्यांवर  अमेरिकेकडून मोठे निर्बंध
Advertisement

वॉशिंग्टन डीसी :

Advertisement

अमेरिकेने भारत, चीन, रशिया आणि इराण यांच्या अनेक कंपन्यांवर मोठे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या कंपन्या इराणची विमान कंपनी आणि इराणच्या आयआरजीसी या सैनिकी संस्थेला मोठे साहाय्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येत आहेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणवर दबाव वाढविण्यासाठी अमेरिकेने हे केल्याचा आरोप केला जातो. या चार देशांच्या एकंदर सहा कंपन्यांवर अमेरिकेचे हे निर्बंध असतील. बंदी घालण्यात आलेली इराणची विमान कंपनी उरलेल्या तीन देशांच्या कंपन्यांच्या साहाय्याने इराणच्या विविध भागांमध्ये शस्त्रपुरवठा करणे, रसद पोहचविणे आणि दारुगोळा पोहचविणे, अशा प्रकारची कामे करीत होती. सैनिकांच्या हालचालीदेखील या कंपनीच्या माध्यमातून केल्या जात होत्या. आयआरजीसीने होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या मालवाहक नौकांकडून खंडणी वसून करण्याचा धडाका लावला होता. या तीन देशांच्या काही कंपन्या या कामात आयआरजीसीला साहाय्य करीत होत्या. त्यामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. या सहा कंपन्या अमेरिकेच्या नौदलाच्या हालचालींची गुप्त महिती इराणला देत होत्या. अमेरिकेसाठी हे धोकादायक होते, असे प्रतिपादन अमेरिकेने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.