दोन रशियन तेल कंपन्यांवर अमेरिकेची बंदी
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
रशियाचा युद्ध निधी रोखण्याच्या उद्देशाने अमेरिकेने बुधवारी रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले. रशिया युद्ध थांबवण्याबाबत गंभीर नसल्याने हे निर्बंध लादण्यात आल्याचे अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या अधिकारक्षेत्रातील या कंपन्यांच्या सर्व मालमत्ता आणि हितसंबंध प्रभावीपणे रोखले जातात. रोसनेफ्ट ही तेल शोध, शुद्धीकरण आणि जागतिक विक्रीमध्ये विशेषज्ञता असलेली सरकारी मालकीची कंपनी आहे, तर लुकोइल ही रशिया आणि परदेशात तेल आणि वायूचे अन्वेषण, शुद्धीकरण, विपणन आणि वितरण करण्यात गुंतलेली खासगी मालकीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 50 टक्के किंवा त्याहून अधिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिस्सा असलेल्या या दोन्ही कंपन्यांच्या सर्व उपकंपन्यांनाही हे निर्बंध लागू होतात.