For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेने उतरविले ईए-37 बी ‘कंपास कॉल’

06:48 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेने उतरविले ईए 37 बी ‘कंपास कॉल’
Advertisement

इराणी रडार, संचार अन् जीपीएससाठी काळ

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इराण युद्ध आता पूर्ण होण्याच्या समीप असल्याचे सांगत सैन्य कारवाई तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या सैन्याच्या एका पावलातून याची सत्यता स्पष्ट होते, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या वायुदलाने महिन्याभराच्या युद्धानंतर आता ईए-37बी ‘कंपास कॉल’ विमान उतरविले आहे.

काय आहे ईए-37बी ‘कंपास कॉल’ विमान?

Advertisement

ईए-37बी कंपास कॉल एक नवे इलेक्ट्रॉनिक युद्धविमान असून ते ब्रिटनच्या  आरएएफ माइल्डनहॉल वायुतळावर दिसून आले आहे. हे विमान ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’मध्ये निर्णायक स्वरुपात मदत करणार असल्याचे मानले जातेय. दोन ईए-37बी विमाने 30 मार्च रोजी एरिझोनाच्या डेविस-मोंथन वायुतळावरून रवाना झाली होती आणि नंतर ब्रिटनमध्ये उतरली. दोन्ही विमानांनी कॉल साइन एक्सिस 41 आणि एक्सिस 43 चा वापर केला. या विमानांमध्ये इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालींसाठी डिझाइन करण्यात आले असल्याने याचे बदलले स्वरुप दिसून आले आहे.

ईए-37बी कंपास कॉलची वैशिष्ट्यो...

-एई-37बी कंपाल कॉल अमेरिकेच्या वायुदलाचे एक असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक लढाऊ विमान आहे, जे शत्रूचा संचार, रडार, जीपीएस अन् नेव्हिगेशन सिस्टीम जाम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

-हे विमान थेट लक्ष्यांवर हल्ला करण्याऐवजी शत्रूची सुरक्षा अन् आक्रमण प्रणालींकरता अडथळे निर्माण करू शकते. याचबरोबर शत्रूच्या हवाई सुरक्षा प्रणालींना माहितीचे आदान-प्रदान करण्यापासून रोखू शकते.

-हे विमान हवाई आणि जमिनीवरी सैन्य अभियानातही मदत करते. याचे मुख्य काम शत्रूच्या कमांड आणि कंट्रोल सिस्टीमचे कार्य रोखणे आणि रडारला अंध करत मित्रदेशांच्या विमानांसाठी मार्ग मोकळा करणे आहे.

-हे विमान जवळपास 770 मैल प्रतितासाच्या वेगाने उडते, तसेच 45 हजार फुटांपर्यंतची उंची गाठू शकते. या विमानाची मारक क्षमता जवळपास 4,400 नॉटिकल मैल आहे.

-ईए-37बी कंपास कॉल विमानात बीएई सिस्टीम्सकडून विकसित प्रगत इलेक्ट्रॉनिक अटॅक (ईए) उपकरणे जोडण्यात आली आहेत. यात चालक दलाचे 9 सदस्य सवार होऊ शकतात.

-यात एक वैमानिक, एक सह-वैमानिक आणि तज्ञांचे टीम सामील असते, जी इलेक्ट्रॉनिक युद्धाशी निगडित ऑपरेशन्स म्हणजेच सिग्नल्सची देखरेख आणि त्यांना रोखण्याची प्रक्रिया सांभाळते.

-यात अॅडव्हान्स्ड सिस्टीम असून तिला ‘स्वॉर्ड-ए’ म्हटले जाते. ही सिस्टीम विमानाला तंत्रज्ञानाला वेगाने अपग्रेड करणे आणि नव्या धोक्यांनुसार स्वत:ला बदलण्यास मदत करते. याच्यामुळे हे आधुनिक कम्युनिकेशन सिस्टीम आणि शत्रूच्या सातत्याने बदलत्या रणनीतिंचा सामना करण्यास सक्षम होते.

अमेरिकेकडे सध्या 5 ईए-37बी विमाने

ईए-37बी हे विमान शत्रूच्या संरक्षणाला कमकुवत करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. हे युद्धादरम्यान शत्रूच्या परस्परांमधील संपर्क आणि ताळमेळ निर्माण करण्याच्या क्षमतेला संपवू शकते. परंतु या विमानाला आता तैनात संपत्तींच्या यादीत सामील करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वायुदलाकडे सध्या 5 ईए-37बी विमाने आहेत आणि या ताफ्याला वाढवून ही संख्या 10 करण्याची योजना आखली जातेय.

Advertisement
Tags :

.