For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर दाखल

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन संरक्षणमंत्री भारत दौऱ्यावर दाखल
Advertisement

आज दिल्लीत ‘टू प्लस टू’ चर्चा होणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यात टू प्लस टू चर्चा शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी होणार असून या बैठकीसाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन गुरुवारी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले. भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेसाठी भारताला भेट देत आहे. या प्रतिनिधी मंडळात संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिनही सहभागी आहेत. टू प्लस टू फ्रेमवर्कनुसार दोन्ही देशांमधील ही पाचवी बैठक असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दोन प्रमुख नेत्यांची भारत भेट ही एक मोठी घटना आहे. विशेष म्हणजे पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेता अमेरिका संघर्ष थांबवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये या मुद्यावर महत्त्वाची चर्चा होऊ शकते. याशिवाय दोन्ही देशांचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे आपल्या समकक्षांसोबत स्वतंत्र बैठकीमध्ये सहभागी होतील. मंत्रीस्तरीय चर्चेनंतर ब्लिंकन आणि ऑस्टिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.