महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सीरिया, इराकवर अमेरिकेचा प्रतिहल्ला

07:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जॉर्डन हल्ल्याला प्रत्युत्तर : 85 लक्ष्यांवर बॉम्बफेक, 6 दहशतवादी ठार

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

Advertisement

जॉर्डनमधील लष्करी तळावर ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सैन्याने शुक्रवारी रात्री सीरिया आणि इराकमधील इराण समर्थित मिलिशियाच्या स्थानांवर बॉम्बफेक केली. सीरियामध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मिलिशियाचे सहा दहशतवादी मारले गेले आहेत. त्यातील तिघे गैर-सिरियन होते. अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि इराक आणि सीरियामधील त्यांच्या समर्थित मिलिशियाशी संबंधित 85 हून अधिक लक्ष्यांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले सुरू केले, असे अमेरिकन सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्करी हवाई हल्ल्यांमध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटर, रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोन स्टोरेज सुविधा तसेच लॉजिस्टिक आणि दारूगोळा पुरवठा साखळी सुविधांना लक्ष्य करण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे. अमेरिकन सैन्याने 85 हून अधिक लक्ष्यांवर 125 हून अधिक युद्ध सामग्रीसह हल्ले केले. त्याचवेळी, सीरियाच्या वाळवंटी भागात आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांवर अमेरिकने हल्ले केल्याचे सीरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितले. या  हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बायडेन यांचा बदला घेण्याचा इशारा

इराण समर्थक दहशतवादी गटांच्या तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेला मध्य-पूर्वेमध्ये संघर्ष नको आहे, परंतु जर अमेरिकेचे कोणतेही नुकसान झाले तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही दिला आहे. गेल्या रविवारी जॉर्डनमध्ये इराण समर्थित दहशतवादी गटांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराण समर्थित गटांवर बदला घेण्याबाबत वक्तव्य केले होते. यानंतर अमेरिकेने शुक्रवारी रात्री पहिला हल्ला केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article