For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-चीनदरम्यान ‘शुल्क’ करार

06:30 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका चीनदरम्यान ‘शुल्क’ करार
Advertisement

30 अब्ज डॉलर्सच्या सामग्रीशी संबंध : ट्रेड कौन्सिल स्थापन करण्याचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिका आणि चीनदरम्यान सुमारे 30 अब्ज डॉलर्सच्या सामग्रीवर आयातशुल्क  आकारण्यावरून सहमती झाली आहे. दोन्ही देश पुढील आर्थिक चर्चेसाठी एक ट्रेड कौन्सिल स्थापन करणार आहेत. हा निर्णय चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेनंतर झाला आहे. क्षी जिनपिंग यांचा हा 2015 नंतरचा पहिला वॉशिंग्टन दौरा होता.

Advertisement

या करारामध्ये अमेरिकेकडून चीनला निर्यात करण्यात येणाऱ्या सामग्रीचा समावेश असल्याचे व्हाइट हाउसचे सांगणे आहे. यात शेतीची सामग्री, लाकूड आणि कॉस्मेटिक्स सामील. तर चीनची छोटी उपकरणे, खेळणी आणि सजावटीच्या सामग्रीवरही योग्य शुल्क आकारण्यात येणार आहे.

दोन्ही देश क्वालांलपूर येथे झालेल्या मागील चर्चेला पुढे नेतील आणि व्यापारावर चर्चा जारी ठेवतील असे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. हा करार वर्तमान व्यापार कराराला दोन महिन्यांनी वाढविण्यात आल्यावर झाला आहे. यामुळे मोठ्या करारावर काम करण्यासाठी वेळ मिळणार असल्याचे अमेरिकेचे वित्त सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितले आहे.

व्हाइट हाउसमध्ये गाठीभेटी

ट्रम्प आणि क्षी यांच्यात गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये अनेक तास चर्चा झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी अधिकारी आणि उद्योजकांसोबत प्रीतिभोजन केले. यात अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमॅन सामील झाले. होते. तर ट्रम्प आणि जिनपिंग यांनी स्थिरता आणि सहकार्यावर जोर दिला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या लाभाचे सहकार्य वाढवावे आणि प्रतिस्पर्धेला मर्यादेत ठेवावे असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

एआयवरही चर्चा होणार

व्यापारासोबत दोन्ही देश आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर (एआय)ही चर्चा सुरू करण्यावर सहमत झाले. यात संधी आणि जोखिम दोन्हींवर चर्चा होईल. नोव्हेंबरमध्ये एआयवर चर्चेची एक फेरी पार पडणार आहे. अधिकारी एआयशी निगडित घटनांवर चर्चा करण्यासाठी एक माध्यमही तयार करतील. व्हाइट हाउसनुसार दोन्ही नेते ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’च्या जागी ‘सुपर इंटेलिजेन्स’ शब्दाचा वापर करण्यावर सहमत झाले. चीनने या शब्दाचे स्वागत करत चर्चेचे आवाहन पेले.

अन्य करार

अमेरिका आणि चीन आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य आणि जी-20 परिषद यासारख्या मोठ्या बैठका आयोजित करण्यास परस्परांना मदत करणार आहेत. ट्रम्प आणि जिनपिंग हे परस्परांच्या देशांमध्ये आयोजित होणाऱ्या बैठकांमध्ये सामील होण्याची योजना आखत आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर विविध देश किंवा संस्थांकडून ट्रान्झिट टोल आकारण्यात येऊ नये असे दोन्ही नेत्यांनी निश्चित केले आहे.

आयातशुल्क वाद

अमेरिका-चीन आयातशुल्क वाद दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्थांदरम्यान दीर्घ व्यापार तणावाशी संबंधित आहे. अमेरिकेने चीनसोबतची व्यापारी तूट, व्यापाराची पद्धत आणि बौद्धिक संपदेच्या मुद्द्यांना आयातशुल्क लागू करण्याचे कारण ठरविले. अमरिकेने 2018 साली चिनी उत्पादनांवर आयातशुल्क लादण्यास सुरुवात केली होती. यानंतर चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर प्रत्युत्तरादाखल आयातशुल्क लादले होते. तसेच चीनने काही दुर्लभ धातूंच्या निर्यातीवर नियंत्रण आणत अमेरिकेची कोंडी केली होती. यानंतर दोन्ही बाजूने आयातशुल्क वाढविण्याचे अनेक निर्णय झाले. चीन अमेरिकेला आयातीहून अधिक निर्यात करतो. याचमुळे त्याच्याकडे आयातशुल्क लादण्यासाठी कमी सामग्री होती. अशास्थितीत त्याने निर्यात नियंत्रण यासारख्या मार्गांचा अवलंब केला.

Advertisement
Tags :

.