For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून तीन भारतीय कंपन्यांवर बंदी

06:00 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून तीन भारतीय कंपन्यांवर बंदी
Advertisement

इराणसोबतच्या व्यापारावरून निर्णय : 12 हून अधिक कंपन्यांवर कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेने 12 हून अधिक कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने यासंबंधी माहिती दिली आहे. इराणच्या सैन्यासोबत अवैध व्यापार आणि मानवरहित हवाईयान ट्रान्सफरच्या सुविधेसाठी भारताच्या तीन कंपन्यांसमवेत 12 हून अधिक कंपन्यांवर बंदी घालण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान इराणी मानवरहित यानांच्या गुप्त विक्रीत या कंपन्यांची, व्यक्तींची भूमिका राहिली असल्याचे म्हटले गेले आहे. इराणवर अमेरिकेने अनेक कठोर निर्बंध लादले आहेत.

Advertisement

सहारा थंडर ही कंपनी इराणच्या वाणिज्यिक कार्यांची देखरेख करणारी प्रमुख कंपनी आहे. सहारा थंडरचे समर्थन करणाऱ्या तीन भारतीय कंपन्या जेन शिपिंग, पोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सी आर्ट शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहेत. सहारा थंडर इराणचे संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दल लॉजिस्टिक्सकडून पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, रशिया आणि अनेक क्षेत्रांमध्ये  इराणी उत्पादनांची विक्री आणि पुरवठ्यात सामील एका विशाल शिपिंग नेटवर्कवर अवलंबून असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

इराणच्या हजारो युएव्हींचे डिझाइन, विकास, निर्मिती आणि विक्रीत सहारा थंडरची महत्त्वाची भूमिका आहे. यातील अनेक ड्रोन्स युक्रेनविरोधी युद्धाकरता रशियाला पुरविण्यात आले आहेत. सहारा थंडरने 2022 पासून उत्पादनांच्या अनेक शिपमेंटसाठी सीएचईएमचा वापर केला आहे. इराणमधील अर्सांग सेफ ट्रेडिंग कंपनीने सीएचईएम समवेत सहारा-थंडर संबंधित शिपमेंटकरता जहाज व्यवस्थापन सेवा प्रदान केली असल्याचा आरोप आहे.

Advertisement
Tags :

.