For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रग्ज तस्करांच्या नौकेवर अमेरिकेचा हल्ला, तीन जण ठार

06:11 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
ड्रग्ज तस्करांच्या नौकेवर अमेरिकेचा हल्ला  तीन जण ठार
Advertisement

वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेच्या सैन्याने कॅरेबियन समुद्रात ड्रग्ज-तस्करांच्या नौकेवर हल्ला केला असून यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. युएस कमांडनुसार ही कारवाई  गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अभियानाच्या अंतर्गत सप्टेंबरपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 151 जण मारले गेले आहेत. हे लोक अमली पदार्थांच्या तस्करीत सामील होते असे अमेरिकेच्या प्रशासनाचे सांगणे आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.