For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अमेरिकेचा इराणच्या बेटावर हल्ला

06:25 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा इराणच्या बेटावर हल्ला
Advertisement

गुप्तपणे केली कार्यवाही, मोठी हानी झाल्याचे वृत्त : अमेरिका अन् इराणमध्ये शांतता करार होण्याची शक्यता : डोनाल्ड ट्रम्प

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेत तेथील लोकप्रतिनिधीगृहांच्या मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान होत असतानाच अमेरिकेने इराणच्या काशेम बेटावर मोठा हल्ला चढविल्याचे वृत्त आहे. मात्र, हा हल्ला आधी घोषणा करून करण्यात आलेला नसून ही कार्यवाही गुप्तपणे करण्यात आली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. इराणशी शांतता करार शक्य आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असतानाच हा हल्ला झाल्याने तो आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, अद्याप इराणने या हल्ल्यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने हल्ल्याचे गूढ वाढले आहे.

Advertisement

अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी हा हल्ला केला. त्याआधी ट्रम्प यांनी इराणशी शांतता करार शक्य असल्याचे विधान केले. इराणला तडजोड हवी आहे. अमेरिकाही समझोत्याला सज्ज आहे. इराणशी करार होणार, या माझ्या विधानामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे दर एकदम 10 डॉलर्स प्रतिबॅरलने कमी झाले आहेत. एकाचवेळी इतकी मोठी तेलदर घट आजपर्यंत झाली नव्हती, असेही प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या वेबसाईटवर केलेले आहे.

अमेरिकेचे नियंत्रित हल्ले

गेले अनेक आठवडे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता असल्याचे दिसून येत आहे. तथापि, अमेरिकेने या काळात इराणवर नियंत्रित आणि लक्ष्यभेदी हल्ले करण्याचे सत्र चालू ठेवले आहे. सोमवारचा काशेम बेटांवरील हल्ला हा, याच नियंत्रित अभियानाचा भाग होता. या हल्ल्याच्या वेळी काशेम बेटावर अनेक स्फोटांचे ध्वनी ऐकू आले. तसेच आगीचे लोळ उठलेले दिसून आले. काशेम हे बेट गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत वसलेले असून ते इराणचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय तेलविक्री केंद्र आहे. त्यामुळेच अमेरिकेने या बेटाला वारंवार लक्ष्य केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

ड्रोन हस्तगत केल्याचा दावा

अमेरिकेचे एक अत्याधुनिक ड्रोन पडकल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. अमेरिकेने त्याला दुजोरा दिलेला नाही. हे ड्रोन आम्ही ‘जिंवत’ (सुस्थितीत’ पकडल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात येत आहे. तथापि, त्याच्या या दाव्याची स्वतंत्र स्रोतांकडून पुष्टी झालेली नाही. तथापि, अशा घटनांमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करार मागे पडत चालल्याचेही दिसून येत आहे.

पहिल्या हल्ल्याला पाच महिने पूर्ण

अमेरिकेने इराणवर 2 जून 2026 या दिवशी काशेम बेटावर प्रथम हल्ला केला होता. त्या हल्ल्याला आता 5 महिने पूर्ण झाले आहेत. या पाच महिन्यांच्या काळात अनेकदा अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबून दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. आता या युद्धाची तीव्रता कमी झाली असली, तरी ते थांबलेले नाही. तसेच जगाला तेलाचा पुरवठा होण्याचा महत्त्वाचा जलमार्ग असणारी होर्मुझची सामुद्रधुनीही अद्याप कार्यरत झालेली नाही. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे कोणते परिणाम समोर येतात, यावर बरेच काही अवलंबून आहे, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.

अमेरिकेच्या निवडणुकांकडे जगाचे लक्ष

अमेरिकेत भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्रीपासून मध्यावधी निवडणुकांच्या मतदानाला प्रारंभ झालेला आहे. अमेरिकेचे तीन समयविभाग असल्याने प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या वेळी मतदाराचा प्रारंभ केला जातो. सध्या सिनेट आणि काँग्रेस या दोन्ही लोकप्रतिनिधीगृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचेच बहुमत आहे. निवडणुकांच्या नंतर काय होणार, यावर अमेरिकेची धोरणेही काही प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे जगाचे लक्ष या निवडणुकांकडे लागलेले आहे.

अमेरिकेचे वारंवार हल्ले

ड गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे इराणवर वारंवार नियंत्रितस्वरुपी हल्ले

ड अमेरिका-इराण युद्धाचे भवितव्य आता अमेरिकेतील निवडणुकांच्या हाती

Advertisement
Tags :

.