कॅरेबियन समुद्रात अमेरिकेचा हल्ला, 11 ठार
06:22 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वॉशिंग्टन
Advertisement
अमेरिकेच्या सैन्याने कॅरेबियन समुद्र आणि प्रशांत महासागरात 3 नौकांवर हल्ला केला असून यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या नौकांद्वारे अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्यानेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे अमेरिकेच्या साउदर्न कमांडकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या सैन्याने मागील वर्षापासून आतापर्यंत अशाप्रकारचे 40 हून अधिक हल्ले केले असून यात आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाला आहे.
Advertisement
Advertisement