For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेचा सीरियात एअर स्ट्राइक, अलकायदाचा दहशतवादी ठार

06:37 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेचा सीरियात एअर स्ट्राइक  अलकायदाचा दहशतवादी ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ दमास्कस

Advertisement

अमेरिकेच्या सैन्याने अल-कायदाशी निगडित दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ दहशतवादी मोहम्मद सलाह अल-जबीरचा खात्मा केला आहे. सीरियाच्या उत्तर-पश्चिम हिस्स्यात अमेरिकेने केलेल्या एका हवाईहल्ल्यात मोहम्मद सलाह अल-जबीरचा मृत्यू झाला आहे.

हा हवाई हल्ला दहशतवाद्यांचे नेटवर्क तोडण्यासाठी करण्यात आला. जबीर हा अल-दीन नावाच्या समुहाशी जोडला गेला होता, हा समूह अल-कायदाशी संबंधित असल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक वक्तव्य जारी करत म्हटले आहे.

Advertisement

सीरियात काही दिवसांपूर्वीच सत्तापालट झाले आहे. बशर अल-असादच्या सरकारला बंडखोर गट तहरीर अल-शामने हटविले आहे. तर अहमद अल-शराला देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अहमद अल-शराच सीरियाचे नेतृत्व करणार आहे. सत्तापालट झाल्यावर बशर अल-असद यांनी परिवारासोबत रशियात आश्रय घेतला आहे. सीरियात मागील 53 वर्षांपासून असाद परिवाराची सत्ता होती.

Advertisement
Tags :

.