उर्वशी रौतेलाला हवा ‘संस्कारी’ जोडीदार
उर्वशी रौतेला अलिकडेच ओटीटी सीरिज इन्स्पेक्टर अविनाश पार्ट 2 मध्ये दिसून आली होती. उर्वशीने आता स्वत:च्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा यावर मत व्यक्त केले आहे. कुठल्याही नात्यात बाहेरील आकर्षणाहून अधिक कौटुंबिक मूल्यं महत्त्वाची असतात असे तिचे म्हणणे आहे. मला पसंत करणाऱ्या लोकांची कमतरता नाही, परंतु जीवनसाथीच्या स्वरुपात मी चांगले संस्कार असणारा जोडीदार निवडू इच्छिते. याचमुळे मी चित्रपटसृष्टीऐवजी अन्य क्षेत्रात कार्यरत इसमाला जोडीदार बनविण्याच्या मताची असल्याचे उर्वशीने म्हटले आहे. जो माणूस मला जाणून घेईल, ज्याचे माझ्यावर प्रेम जडेल असाच जोडीदार मला हवा आहे. जोडीदार कसा दिसतो हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझ्यासाठी कौटुंबि मूल्यं महत्त्वाची आहेत. अनेक पुरुष कुठल्याही प्रकारचे वचन देण्यास घाबरतात. परंतु ज्यांना चांगले कौटुंबिक संस्कार प्राप्त झाले आहेत, ते जबाबदारी स्वीकारण्यास हयगय करत नसल्याचे उर्वशीने म्हटले आहे.