For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गगनगडावर 4 जानेवारीला हजरत गैबीपीर व विठ्ठलाई देवीचा उरुस

04:45 PM Dec 23, 2023 IST | Kalyani Amanagi
गगनगडावर 4 जानेवारीला हजरत गैबीपीर व विठ्ठलाई देवीचा उरुस
Advertisement

देवस्थानचे पुजारी रफिक काजी यांची माहिती

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

गगनबावडा येथील गगनगडावरील हजरत गैबीपीर व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (4 जानेवारी) आहे. या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथ्रयाची साफसफाई आणि रंग रंगोटी करण्यात येत आहे. शिवाय गैबी दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी रफिक काझी यांनी यावेळी दिली.

Advertisement

उरूस उत्त्सवाच्या निमित्ताने 3 जानेवारी बुधवारी संदल चढविण्यात येणार आहे. तर 4 जानेवारी रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता गलेफ गगनगडावर नेण्यात येणार आहे. तर रात्री आठ वाजता मानाचा गलेफ दर्ग्यातील तुरबतीवर निलराजे पंडित बावडेकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहे. तसेच गगनगिरी आश्रम मार्फतही बापू पाटणकर गलेफ अर्पण करतात. यानंतर श्री विठ्ठलाईदेवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. हिंदू-मुस्लीम एक्याचे प्रतिक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.

उत्सवाचा मुख्य दिवशी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी गगनगड देवस्थानच्या वतीने बापूसाहेब पाटणकर, पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्यासह भाविक या उत्सवासाठी येथे उपस्थिती लावतात. कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यातील भाविक देखील या उत्सवासाठी उपस्थित राहतात. उत्त्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकासाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बाबूजमाल कलंदर नुरे मैफील यांचे कडून नात गायन होणार आहे. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात हा उरूस उत्सव होत असतो. त्याची तयारी देखील काही दिवस अगोदर सुरू असते. त्यानुसार प्रतिवर्षी प्रमाणे होणाऱ्या या उत्सवाची तयारी सद्या सुरू असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.