For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maghribi Peer | साताऱ्यात मगरीबी पीर दर्ग्याचा उरुस सोहळा उत्साहात; हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव

01:31 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
maghribi peer   साताऱ्यात मगरीबी पीर दर्ग्याचा उरुस सोहळा उत्साहात  हिंदू मुस्लिम बांधवांनी जपला बंधुभाव
Advertisement

                साताऱ्यात मगरीबी पीर उरुसानिमित्त भव्य मिरवणूक

Advertisement

सातारा : शहरातील सदर बाजारपरिसरात असलेल्या हजरत सैय्यद सादात शाह उर्फ मगरीबी पीर दर्यावर वार्षिक उरुस सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. उरुस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत शहरातील विविध भागातून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

उरुस काळात दर्यावर चादर अर्पण, फातेहा पठण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत बंधुभावाचे सुंदर दर्शन घडवले.

Advertisement

संदल मिरवणुकी दरम्यान भाविकांनी फुले, इत्र अर्पण करत प्रार्थना केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांमध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. याशिवाय दर्गा परिसरात लंगर (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली असून, सर्वधर्मीय भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

हजरत सैय्यद सादात शाह उर्फ मगरीबी पीर हे सूफी परंपरेतील संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी साताऱ्यात वास्तव्यास राहून मानवता, एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे आजही विविध धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने दर्यावर दर्शनासाठी येतात.

Advertisement
Tags :

.