महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उरुग्वेचा बोलिव्हियावर एकतर्फी विजय

06:32 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्ट रुदरफोर्ड

Advertisement

कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत येथे गुरूवारी रात्री खेळविण्यात आलेल्या सामन्यात उरुग्वेने बोलिव्हियाचा 5-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आपले मार्गक्रमण केले आहे.

Advertisement

या सामन्यात आठव्या मिनीटाला पेलीस्ट्रीने उरुग्वेचे खाते उघडले. 21 व्या मिनीटाला नुनेझने उरुग्वेची आघाडी वाढविली. नुनेझचा गेल्या सात सामन्यातील हा दहावा गोल आहे. 77 व्या मिनीटाला अॅराजोने उरुग्वेचा तिसरा गोल केला. या स्पर्धेतील अॅराजोचा हा दुसरा गोल आहे. 81 व्या मिनीटाला फेड्रीको व्हॅलवेर्दने उरुग्वेचा चौथा गोल नोंदविला. सामना संपण्यास एक मिनीट बाकी असताना रॉड्रीगो बेनटेनक्युरने उरुग्वेचा पाचवा आणि शेवटचा गोल नोंदवून बोलिव्हियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत उरुग्वेने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. उरुग्वेने आतापर्यंत 15 वेळा कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे. आता उरुग्वेचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना अमेरिकेबरोबर सोमवारी होणार आहे. हा सामना उरुग्वेने बरोबरीत राखल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविता येईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article