महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उर्मिला मातोंडकर घेणार घटस्फोट

06:43 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोहसिन मीरपासून होणार विभक्त

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातेंडकरने विवाहाच्या आठ वर्षांनी पती मोहसिन अख्तर मीरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. उर्मिलाने हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. परंतु घटस्फोटामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हा घटस्फोट दोघांच्या सहमतीने झाला नसल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

अभिनेत्रीने याप्रकरणी मौन बाळगले आहे. घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला असून पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा केली जात असल्याचे समजते. तर दुसरीकडे उर्मिलान पती मोहसिनला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. तर मोहसिन अद्याप उर्मिलाला फॉलो करत आहे.

मोहसिन हा एक काश्मिरी उद्योजक अन् मॉडेल आहे. दोघांची भेट कॉमन फ्रेंड आणि फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राद्वारे झाली होती. 2014 मध्ये पहिल्यांदा भेटल्यावर आणि काही काळापर्यंत परस्परांना डेट केल्यावर 2016 मध्ये दोघांनी विवाह केला होता.

मोहसिनने 2009 साली प्रदर्शित ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो लक बाय चान्स, मुंबई मस्त कलंदर आणि बीए पास यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. परंतु नंतर त्याने व्यवसायावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते.

उर्मिला मातोंडकर लवकरच तिवारी नाव असलेल्या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. याच्या माध्यमातून ती अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करत आहे. तसेच याद्वारे ती ओटीटीवर पदार्पण देखील करणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article