कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लय भारी! UPSC परीक्षेत कोल्हापूरच्या चारजणांचा डंका

12:17 PM Apr 23, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

कोल्हापूरच्या चार विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा रोवला आहे

Advertisement

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) घेण्यात आलेल्या 2024 नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात कोल्हापुरातील फुलेवाडी येथील हेमराज पनोरेकर, यमगे (ता. कागल) येथील बिरदेव ढोणे, जयसिंगपूर येथील आदिती चौगुले, जांभुळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील दिलीप देसाई यांनी बाजी मारली आहे.

Advertisement

तसेच कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणारे रोहित पिंगळे (पुणे), ऋषीकेश वीर (गोवा), यांनी देखील यश संपादन केले आहे. कोल्हापूरच्या चार विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा रोवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांसह कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युपीएससीतर्फे 16 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 20 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत मुख्य परीक्षा झाली. जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये मुलाखती पार पडल्या. त्यानंतर युपीएससीने परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला असून 1 हजार 9 उमेदवारांच्या नावांची गुणवत्ता यादीत जाहीर केली आहे.

यात सामान्य प्रवर्ग (335), आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्ग (109), ओबीसी प्रवर्ग (318), अनुसूचित जाती (160) तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून (87) उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये हेमराज पनोरेकर यांनी 922 वी रँक, बिरदेव ढोणे यांनी तिसऱ्या प्रयत्नात युपीएससीत यश संपादन करीत 551 वी रँक, आदिती चौगुले यांनी 63 वी रँक मिळवत यश संपादन केले.

भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससीत यश मिळवले. रोहन पिंगळे यांनी 581 वी रँक तर ऋषीकेश वीर यांनी 556 वी रँक मिळवली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. युपीएससी परीक्षेत कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. नियमित पुस्तकांचे वाचन आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल, अशा भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून युपीएससी उत्तीर्ण होण्याचे आपले ध्येय गाठले आहे.

अभ्यासातील सातत्यामुळेच यश

"बिरदेव ढोणे यांचा मेंढी पालन हा व्यवसाय आहे. नियमित पुस्तकांचे वाचन आणि अभ्यासातील सातत्यामुळेच मला हे यश मिळाले. वडील सिदाप्पा व आई बाळाबाई यांच्या कष्टामुळेच मला हे यश मिळाले आहे."

सेल्फ स्टडीवर भर

"घरात राहून मी सेल्फ स्टडी केला. चौथ्या प्रयत्नात हे यश मिळाले. आई संगीता पनोरेकर, वडील हिंदुराव पनोरेकर यांच्यामुळेच यश मिळाले आहे. संयम, अभ्यासातील सातत्यानेच परीक्षा उत्तीर्ण झालो."

जांभूळवाडीचा दिलीपकुमार देसाई आयएएस अधिकारी

गडहिंग्लज : तालुक्यातील छोट्याशा जांभूळवाडी या गावातील दिलीपकुमार कृष्णा देसाई याने युपीएससी परीक्षेत 605 वी रँक घेत यश मिळवले. जांभूळवाडी येथील पहिलाच आयएएस अधिकारी होण्याचा मान दिलीपकुमारला मिळाला आहे. सातत्याने केलेला अभ्यास यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीपचे वडील कृष्णा देसाई सेवानिवृत्त माजी सैनिक. जांभूळवाडी गावातच बसस्थानकावर किराणा मालाचे दुकान चालवतात. त्यांची मुलगी स्वाती देसाई या उपजिल्हाधिकारी म्हणून नागपुरात सेवा बजावत आहेत. बहीण स्वाती शासकीय सेवेत असल्याने दिलीपकुमार यानेसुध्दा शासकीय सेवेत दाखल होण्याचे ठरवले होते.

इस्लामपूर येथील आरआयटी कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर त्याने दिल्ली गाठली. याठिकाणी गेले 9 वर्षे अभ्यास करत असताना यावेळच्या परीक्षेत त्याला यश मिळाले. यावेळी दिलीपकुमार याने निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. 6 वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.

3 वेळा मुलाखती झाल्या होत्या. पण यश हुलकावणी देत होते. अखेर 9 वर्षांनी आपण यशाला गवसणी घातली आहे. बहीण, आई, वडिलांचा मिळणारा पाठिंबा, प्रोत्साहन यामुळे या यशापर्यंत पोहोचल्याचे त्याने सांगितले.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#UPSCexamresult#UPSCRankupsc result 2025
Next Article