एलपीजी पुरवठ्यावरून सभागृहात गोंधळ
केंद्र सरकार जबाबदार असल्याचा सत्ताधारी सदस्यांचा आरोप : प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राचा दोष देणे योग्य नव्हे
प्रतिनिधी/ बेंगळूर
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय आणण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या विधानावरून बुधवारी विधानसभेत मोठा गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक वादविवाद झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शून्य प्रहरात काँग्रेसचे एच. डी. रंगनाथ यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील व्यत्ययाचा मुद्दा उपस्थित करत व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी दुप्पट किमतीत सिलिंडर विकले जात आहेत. सरकारने सिलिंडर पुरवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न केला.
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री सभागृहात नाहीत. त्यांनी आल्यानंतर या प्रश्नावर उत्तर दिले जाईल, असे सभाध्यक्ष म्हणत असतानाच मंत्री मुनियप्पांचे सभागृहात आगमन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, नुकतीच तेल कंपन्यांसोबत बैठक घेतली आहे. घरगुती सिलिंडरची कोणतीही समस्या नाही. ग्राहकांनी सिलिंडरचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे रंगनाथ यांनी केंद्र सरकारच्या वाईट परराष्ट्र धोरणामुळे सिलिंडरची कमतरता असल्याचा आरोप करताच भाजप सदस्य संतप्त झाले. सर्व भाजप सदस्य एकाचवेळी उभे राहून या प्रकरणात राजकारण करणे योग्य नाही. युद्ध सुरू असल्यामुळे सिलिंडरची कमतरता निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला दोष देणे योग्य नाही. पंतप्रधान मोदींचे नाव घेतले नाही तर काँग्रेसला त्यांनी खाल्लेले पचवता येत नाही, असे मोठ्या आवाजात सांगितले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या गोंधळादरम्यान बोलताना मंत्री प्रियंका खर्गे म्हणाले, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी सांगितल्याप्रमाणे सिलिंडरची कमतरता नाही. काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवल्या. सिलिंडरची कमतरता नसल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारने मंगळवारी Sिंश्A लागू केला. यावरून संकट असल्याचे दिसून येते. आम्ही यात राजकारण करत नाही आहोत. सभागृहात कोणी खोटे बोलले? काळजी नसल्याचे सांगून केंद्राने Sिंश्A का लागू केला, असा सवाल त्यांनी केला. मंत्र्यांच्या बोलण्यावर संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी प्रियांक खर्गे यांच्यावर हल्ला चढवला. यामुळे सभागृहात गोंधळ आणखी वाढला.
भाजपचे सुनील कुमार उभे राहिले आणि म्हणाले की युद्धादरम्यान तुम्ही असे बोलू नये. युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. अन्नमंत्री योग्य उत्तर देत होते. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सभागृहात आले. त्यानंतर परिस्थिती थोडी थंडावली आणि मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास सुऊवात केली. शून्य प्रहरात सर्वजण गरजेपेक्षा जास्त बोलत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी चिंता नसल्याचे म्हटले होते, असे प्रियांक खर्गे यांनी सांगितले आहेत. जर चिंता नसेल तर Sिंश्A लागू करणे योग्य आहे का?, आम्ही राजकारण करत नाही. विरोधकांनी काहीही वक्तव्य करू नये, असे विरोधी सदस्यांना सांगितले.
भाजप आमदार सुनील कुमार संतप्त
युद्धादरम्यान तुम्ही असे बोलू नये. युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. आहारमंत्र्यांनी योग्य उत्तर देत होते. पण काही काँग्रेस सदस्यांनी त्याचे राजकारण केले आहे, असे भाजप आमदार सुनील कुमार म्हणाले. केंद्राच्या क्षमतेबद्दल बोलणारे तुम्ही सर्व्हरची समस्या सोडवण्यास सक्षम नाही. मलनाड भागात वाळूची कमतरता असून ती योग्यरित्या सोडवली जात नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य पगार देण्याची क्षमता तुमच्यात आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी पुन्हा भाजप आणि काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.