For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी मुद्यावरून संसदेत गदारोळ

07:10 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी मुद्यावरून संसदेत गदारोळ
Advertisement

दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

संसदेच्या अधिवेशनादरम्यान बुधवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांनी अदानी मुद्यावरून गदारोळ केला. 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाला. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही विरोधकांनी उचलून धरला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज गुरुवार, 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, प्रियंका गांधी 28 नोव्हेंबरला खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. केरळमधील वायनाड येथून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. बुधवारी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र मिळाले.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर अदानींवरील मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. अदानांवर अमेरिकेत 2 हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगवास ठोठावणे अपेक्षित असताना मोदी सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. अदानी यांनी भारतातील सौर उर्जेशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 265 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,200 कोटी रुपये) लाच देण्याची योजना आखली होती, असा ठपका ठेवण्यात आला आहे. यावर अदानी समूहाने आपली भूमिका स्पष्ट करताना सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधक या मुद्याचे ‘राजकारण’ करत आहे.

दोन्ही सभागृहात गोंधळाचे वातावरण

बुधवारी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा सभागृहात पुन्हा गदारोळ झाला. ही कारवाई 10 मिनिटे चालली. त्यानंतर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तसेच राज्यसभेतील गदारोळानंतर सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केले. राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज साडेअकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनात उपस्थित करावयाच्या मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Advertisement
Tags :

.