महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य सोसायटीतर्फे १६ मार्चला महिलांसाठी उन्नती कार्यक्रम

11:21 AM Mar 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

'खेळ पैठणीचा' कार्यक्रम असणार प्रमुख आकर्षण ; महिलांनी सहभागी व्हावे

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
देशातील अग्रगण्य अशा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे खास महिलांसाठी उन्नती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये 'खेळ पैठणीचा' कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध मनोरंजनाचे खेळ घेण्यात येणार आहेत व सहभागी महिलांना यातून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. दैनंदिन घर कामातून, ऑफिसच्या कामातून महिलांना विरंगुळ्याचे क्षण अनुभवता येतील. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिलांनी त्यामध्ये सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी 02363-2747248275379888 वर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# sawantwadi # sindhudurg# tarun bharat news# lokmanya multipurpose society #
Next Article