युपीआय व्यवहार पोहचले विक्रमी टप्प्यावर
डिसेंबर 2023 मधील आकडेवारी सादर
नवी दिल्ली :
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) ने डिसेंबर 2023 मध्ये 1,202 कोटी व्यवहारांचा नवा विक्रम प्राप्त केला आहे. या काळात लोकांनी 18,22,949.45 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. तर एक महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये 1,123 कोटी व्यवहारांद्वारे 17,39,740.61 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने आपल्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पेमेंट सिस्टमचे हे आकडे शेअर केले आहेत. डिसेंबरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, व्यवहारांची संख्या 54 टक्क्यांनी वाढली आहे आणि त्याद्वारे हस्तांतरित केलेली रक्कम वार्षिक आधारावर 42 टक्क्यांनी वाढली आहे.
एनपीसीआयच्या डाटानुसार, 2023 मध्ये एकूण 11,724 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. याद्वारे हस्तांतरित केलेले मूल्य 182.3 लाख कोटी रुपये आहे.
युपीआय कसे काम करते?
युपीआय सेवेसाठी तुम्हाला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस तयार करावा लागेल. यानंतर ते बँक खात्याशी लिंक करावे लागेल. यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव किंवा आयएफएससी कोड इत्यादी लक्षात ठेवण्याची गरज नाही. पेमेंट प्रदाता तुमच्या मोबाईल नंबरनुसार पेमेंट विनंतीवर प्रक्रिया करतो.
तुमच्याकडे त्याचा युपीआय आयडी (ई-मेल आयडी, मोबाइल नंबर किंवा आधार क्रमांक) असल्यास तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे सहज पैसे पाठवू शकता. युटिलिटी बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, शॉपिंग इत्यादींसाठी केवळ पैसेच नाही तर नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचीही गरज भासणार नाही. या सर्व गोष्टी तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीद्वारे करू शकता.
2