युपीआयच्या व्यवहारात जूनमध्ये घट
व्यवहारात 3 टक्के घट, 28.92 लाख व्यवहार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांमध्ये जूनमध्ये 3 टक्के घसरण पहायला मिळाली. 28.92 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांचे व्यवहार जूनमध्ये झाले होते. या अगोदरच्या म्हणजेच मे महिन्यात 29.9 लाख कोटी रुपयांचे युपीआय व्यवहार झाले होते. मागच्या महिन्यामध्ये युपीआयची व्यवहार संख्या व मूल्य दोन्हीही विक्रमी स्तरावर राहिले होते.
व्यवहारात 2 टक्के घट
युपीआय व्यवहारांची संख्या 2 टक्के घसरली आहे. जून महिन्यात 22.72 अब्ज इतके व्यवहार युपीआयच्या माध्यमातून झाले आहेत. याआधी मे मध्ये 23.2 अब्ज युपीआय व्यवहार झाले होते. मागच्या वर्षाच्या जूनच्या तुलनेत युपीआय मुल्यामध्ये पाहता 20 टक्के वृद्धी झाली आहे. तर युपीआय व्यवहारांची संख्या 23 टक्के वाढली आहे. जूनमध्ये दैनंदिन युपीआय देवाण-घेवाणीचे मूल्य 96,405 कोटी रुपयांचे राहिले आहे. मे महिन्यात 96,465 कोटी रुपये इतके होते. दैनंदिन व्यवहार संख्या 75.7 कोटींवर पोहोचली आहे.