For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 वर्षांत यूपीआय हजार मिनिटे ठप्प

06:13 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
5 वर्षांत यूपीआय हजार मिनिटे ठप्प
Advertisement

मार्च 2020 ते मार्च 2025 पर्यंत 17 घटनांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू वर्षी 12 एप्रिल रोजी देशाच्या रिअल-टाइम पेमेंट सिस्टीम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) मध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळात चौथ्यांदा समस्या आल्या. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्यवहार बिघाडासाठी तांत्रिक समस्यांना जबाबदार धरले आहे.

Advertisement

एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च 2020 ते मार्च 2025 पर्यंत 17 प्रकरणांमध्ये युपीआय एकूण 995 मिनिटे डाउन होते. या वर्षी एप्रिलमधील दोन घटनांचा समावेश केल्यास मार्च 2020 पासून युपीआय 1,000 मिनिटांपेक्षा जास्त काळ डाउन आहे. तथापि, एप्रिलमध्ये यूपीआय बंद झाल्याचा डेटा एनपीसीआयच्या वेबसाइटवर अद्याप उपलब्ध नाही.

एनपीसीआयचे म्हणणे...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर दिलेल्या निवेदनात, एनपीसीआयने म्हटले आहे की, ‘एनपीसीआय सध्या अधूनमधून तांत्रिक समस्यांना तोंड देत आहे, ज्यामुळे यूपीआय व्यवहारांमध्ये अंशत: घट होत आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला माफ करा.’ जुलै 2024 मध्ये यूपीआयमध्ये 207 मिनिटांसाठी अडथळा जाणवला होता. तथापि, यूपीआयचा अपटाइम (ज्या कालावधीत व्यवहार सेवा कार्यरत राहतात) दरमहा सातत्याने 99 टक्क्यांपेक्षा जास्त होता, जो पेमेंट सिस्टमच्या कार्यक्षमतेचा उच्च दर दर्शवितो.

फोन पे आघाडीवर

यूपीआयवर दोन फिनटेक कंपन्यांचे वर्चस्व अलीकडच्या काळात मोठ्या चिंतेचा विषय बनले आहे. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये फोन पे ने 47.25 टक्के बाजार हिस्सा मिळवून अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर गुगल पे आहे ज्याचा बाजार हिस्सा 36.04 टक्के आहे. पेटीएमचा हिस्सा 6.67 टक्के आहे. मुख्य दोन कंपन्यांचा एकत्रित बाजार हिस्सा 83 टक्क्यांहून अधिक आहे, तर पेटीएम जोडल्यास, तीन फिनटेक फर्मचा बाजार हिस्सा 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Advertisement
Tags :

.