For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपीआयने 2025 मध्ये सर्व विक्रम मोडले

06:48 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
युपीआयने 2025 मध्ये सर्व विक्रम मोडले
Advertisement

डिजिटल व्यवहारांमध्ये 30 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) साठी 2025 हे वर्ष उत्तम राहीले आणि मूल्य आणि आकारमानाच्या बाबतीत व्यवहारांकरीता एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

Advertisement

यामध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये युपीआयद्वारे 21.63 अब्ज व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य 27.97 लाख कोटी रुपये आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर व्यवहारांची संख्या आणि मूल्य अनुक्रमे 29 टक्के आणि 20 टक्के वाढले. गेल्या महिन्याच्या तुलनेत संख्येच्या आधारावर 5.66 टक्के आणि मूल्याच्या आधारावर 6.26 टक्के वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये युपीआयद्वारे होणारे व्यवहार 20.7 अब्ज रुपयांवर पोहोचले, ज्याचे मूल्य 27.28 लाख कोटी रुपये होते, कारण सणासुदीच्या हंगामात खर्च झाला होता. वर्ष 2025 मध्ये युपीआयद्वारे 300 लाख कोटी रुपयांचे 228 अब्ज पेक्षा जास्त व्यवहार झाले, जे संख्येच्या बाबतीत 32.5 टक्के आणि मूल्याच्या बाबतीत 21 टक्के आहे.

Advertisement
Tags :

.