उपेंद्र यादव, कर्ण शर्मा यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीचे राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 13 वर्षानंतर पुनरागमन झाले. दिल्ली संघाकडून तो या सामन्यात खेळत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नवदीप सेन, सिद्धांत शर्मा आणि ग्रेवाल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रेल्वेला पहिल्या डावात 67.4 षटकात 241 धावांवर रोखले. रेल्वेच्या पहिल्या डावामध्ये उपेंद्र यादवने दमदार 95 धावा तर कर्ण शर्माने 50 धावा जमविल्या. या जोडीने रेल्वेचा डाव सावरला. तत्पूर्वी रेल्वेची स्थिती नाजूक होती. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 104 धावांची भागिदारी केली. कोहली खेळणार असल्याने या सामन्याला पहिल्या दिवशी 12 हजार शौकिनांनी उपस्थिती दर्शविली. दिल्लीतर्फे नवदीप सेन आणि सुमीत माथूर प्रत्येकी 3 बळी, ग्रेवालने 2 गडी बाद केले. दिल्लीने दिवसअखेर पहिल्या डावात 10 षटकात 1 बाद 41 धावा जमविल्या.
संक्षिप्त धालफलक
रेल्वे प. डाव 67.4 षटकात सर्वबाद 241 (उपेंद्र यादव 95, कर्ण शर्मा 50, नवदीप सेन व माथुर प्रत्येकी 3 बळी, ग्रेवाल 2 बळी, दिल्ली प. डाव 10 षटकात 1 बाद 41)