महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यसभेवर जाणार उपेंद्र कुशवाह

06:38 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रालोआकडून घोषणा : बिहारच्या नेत्याचे राजकीय पुनर्वसन  

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह हे राज्यसभेवर जाणार आहेत. रालोआकडून अधिकृत स्वरुपात कुशवाह यांना राज्यसभेवर पाठविले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर कुशवाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत रालोआच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

राज्यसभा सदस्यत्वासाठी रालोआकडून माझ्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. बिहारची सर्वसामान्य जनता तसेच राष्ट्रीय लोकमोर्चासमवेत रालोआच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही माझ्याबद्दल स्वत:चे प्रेम कायम राखले असल्याचे उद्गार कुशवाह यांनी काढले आहेत. कुशवाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, जीतनराम मांझी, सम्राट चौधरी यांचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीत रालोआचे उमेदवार म्हणून कुशवाह यांनी काराकाट मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु येथील त्रिकोणी लढतीत कुशवाह यांना पराभव पत्करावा लागला होता. येथे भाकप मालेचे राजाराम सिंह तसेच भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांचे आव्हान कुशवाह यांच्यासमोर होते. मतविभागणीमुळे कुशवाह यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article