सुधारित महिंद्रा ‘थार’ लवकरच होणार लाँच
एसयुव्ही गटात ठरणार आकर्षण : पुढील आठवड्यात येण्याची शक्यता
वृत्तसंस्था, मुंबई
महिंद्रा कंपनीची बहुचर्चित थार ही लवकरच सुधारित आवृत्तीसह भारतीय बाजारात लाँच होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एसयूव्ही गटातील ही कार ‘थार रॉक्स’ याची प्रेरणा घेऊन नव्याने शैलीदार बनविण्यात आली आहे. थार सुधारित कार तीन दरवाजांची असणार असल्याचे समजते. मागच्या ऑक्टोबर 2025 मध्ये याची सुधारित आवृत्ती सादर करण्यात आली होती. यावेळेला मात्र बाह्या डिझाईनवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
काय असणार वैशिष्ठ्यो
थार सुधारित कारचा समोरचा लूक हा रॉक्स सारखाच असणार आहे. यामध्ये गोल एलईडी हेडलॅम्पस ग्रीलसह सादर केले जाणार आहेत. हेडलॅम्पमध्ये सी आकाराची एलईडी डे टाईम रनिंग लाईटची सोय असून फ्रंट बम्पर व टर्न इंडिकेटर्स यामध्ये काहीसे बदल करण्यात आले आहेत. या गाडीमध्ये मॅकॅनिकल दृष्ट्या पाहता कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
इंधन पर्याय व लुक
2.0 लिटर टब्रो पेट्रोल, 2.2 लिटर डिझेल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन या पर्यायासह नवी गाडी सादर होणार आहे. या वेळच्या नव्या सुधारित थारचे स्वरुप हे अधिक आकर्षक आणि आधुनिक असणार असल्याचेही बोलले जात आहे. पुढील आठवड्यामध्ये भारतीय बाजारात सुधारित थार दाखल केली जाऊ शकते.