बॉलिवूड वाइव्सवर येणार चित्रपट
मधुर भांडारकर करणार निर्मिती
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर हे वास्तविक जीवनातील घटनांवर प्रेरित होत चित्रपट तयार करत असतात. फॅशन, हीरोइन आणि पेज 3 यासारख्या अनेक चित्रपटांसाठी लोकप्रिय मधुर यांनी अलिकडेच नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘वाइव्स ऑफ बॉलिवूड’ असणार आहे. हा चित्रपट अभिनेत्यांयच पत्नींच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याविषयी असेल.
हा चित्रपट मनोरंजन जगतातील लोकांच्या भवतालवर आधारित असेल. मी या विषयावर पूर्ण संशोधन करूनच चित्रपट निर्माण करणार आहे. माझा पुढील चित्रपट बॉलिवूडच्या पत्नींविषयी आहे. या चित्रपटाचे नाव ‘वाइव्स ऑफ बॉलिवूड’ असणार आहे. हा विषय प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. एका मेगा-सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही. प्रेक्षकांना त्यांच्याविषयी खूप काही जाणून घेण्यास मिळेल असे भांडारकर म्हणाले.
यासंबंधीच्या चित्रपटात अनेकदा बदल करण्यात आले आहेत. हा चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांचे डोळे उघडणारा असेल. मी अनेक खऱ्याखुऱ्या बॉलिवूड पत्नींकडुन प्रेरणा घेतली आहे. पेज 3, फॅशन आणि कॉर्पोरेट यासारख्या चित्रपटांना ज्याप्रकारे लोकांचे कौतुक मिळाले होते, त्याचप्रकारे वाइव्स ऑफ बॉलिवूडचे कौतुक होईल असे दिग्दर्शकाने म्हटले आहे.