केआरएन हिट एक्सचेंजरचा येणार आयपीओ
वृत्तसंस्था/ मुंबई
केआरएन हिट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेड कंपनी आपला आयपीओ या आठवड्यात सादर करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 342 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. केआरएन हिट एक्सचेंजरचा आयपीओ 25 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 27 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना 24 सप्टेंबरपासून आयपीओकरीता गुंतवणुकीसाठी बोली लावता येणार आहे. कंपनीने या आयपीओकरिता इशू किंमत 209-220 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. कंपनीचे मुख्यालय राजस्थान येथे असून आयपीओतील रक्कम कंपनीला विस्तारासाठी वापरायची आहे.
कंपनीची ओळख
सदरची कंपनी हिट वेंटीलेशन एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशनसंबंधित उद्योगाला लागणाऱ्या फिन आणि ट्यूब प्रकारच्या हिट एक्सचेंजर्सची निर्मिती करते. कंपनी आयपीओ अंतर्गत 1.55 कोटी नवे समभाग सादर करणार आहे. मागच्या महिन्यात आयपीओपूर्वीच 9.54 कोटी रुपयांची उभारणी करण्याची घोषणा कंपनीने केली होती.