For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडचा येणार आयपीओ

06:22 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेडचा येणार आयपीओ

मुंबई :

Advertisement

पोलाद उत्पादने बनवणारी कंपनी केपी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड यांचा आयपीओ 15 मार्चला शेअर बाजारामध्ये खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 189 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे समजते.

के पी एनर्जी यानंतर केपी समूहातील ही तिसरी कंपनी आपला आयपीओ बाजारात सादर करत आहे. कंपनीने वर्ष 2016 मध्ये 6.44 कोटी रुपयांची उभारणी केली होती. सदरचा आयपीओ 15 मार्च रोजी खुला होणार असून 19 मार्च रोजी बंद होणार आहे. शेअर बाजारात हा समभाग 22 मार्चला सूचिबद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.  189 कोटी रुपयांची उभारणी आयपीओ अंतर्गत होणार असून 1.31 कोटी इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.