इ-कॉम एक्स्प्रेसचा येणार आयपीओ
2600 कोटी उभारणार : सेबीकडे अर्ज दाखल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इ-कॉम एक्सप्रेस लिमिटेड यांचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार असून यासंदर्भातली आवश्यक कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे कंपनीने सोपवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
इकॉम एक्सप्रेस लिमिटेड सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 2600 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. अलीकडेच कंपनीने रीतसर कागदपत्रांसह आयपीओकरिता सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. कंपनी आयपीओ अंतर्गत 1284.50 कोटी रुपयांचे ताजे समभाग आणि 1315 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे.
रक्कमेचा वापर
सदरच्या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेली रक्कम नव्या प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी त्याचप्रमाणे इतर कामासाठी वापरली जाणार आहे. 73 कोटी कोटी रुपये संगणक आणि आयटी उपकरणांसाठी त्याचप्रमाणे 239 कोटी रुपये खर्च तंत्रज्ञान, डाटा सायन्स यांची क्षमता वाढवण्यासाठी केला जाणार आहे. 88 कोटी रुपयांचे कर्जही कंपनी फेडणार असल्याचे समजते.
कंपनी आयपीओ उभारणीआधी 257 कोटी रुपयांची उभारणी करण्याची तयारी करत आहे. इ कॉम एक्सप्रेस ही कंपनी संपूर्ण भारतभरामध्ये एक्सप्रेस लॉजिस्टिक नेटवर्क संचालित करते.