For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यूपी वॉरियर्सच्या नव्या जर्सीचे अनावरण

06:12 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
यूपी वॉरियर्सच्या नव्या जर्सीचे अनावरण
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

यूपी वॉरियर्सने आगामी महिला प्रीमियर लीग हंगामासाठी नवीन प्लेइंग जर्सीचे अनावरण केले. संघाचे अधिकृत डिझाइन भागीदार असलेल्या एकाया बनारस यांच्या सहकार्याने या जर्सीचे डिझाईन केले आहे.

ही जर्सी बनारसी वस्त्र वारसा उच्च कार्यक्षमता असलेल्या खेळाशी जोडते. जी वॉरियर्सचे धैर्य, ओळख आणि निर्भीड क्रिकेटच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब आहे. यूपी वॉरियर्स आणि एकाया यांच्या सहकार्याने ‘अ ब्लूमिंग रिबेलियन’ ही जर्सी सादर केली आहे. जी समकालीन खेळ आणि कालातीत हस्तकलेचे मिश्ा़dरण आहे. बनारसच्या पुष्प वारसा आणि एकायाच्या प्रतिष्ठित विणकाम परंपरेतून प्रेरणा घेवून हे डिझाइन सांस्कृतिक आकृतिबंधांचा आधुनिक, कामगिरी केंद्रीत दृष्टिकोनातून पुनर्व्याख्या करते. प्रेरणा घेवून ही जर्सी रेशीम आणि कथाकथनाची भाषा एका ठळक, भविष्यवेधी क्रीडा सौंदर्यात रुपांतरित करते. संस्कृती, ओळख आणि आधुनिक स्त्राrत्वाचा सन्मान करण्यासाठी डिझाईन केलेली ही किट, परंपरा आपल्या स्वत:च्या अटींवर पुढे नेणाऱ्या महिलांची एक दृश्य अभिव्यक्ती म्हणून उभी आहे.

Advertisement

जर्सीवर बनारसी प्रेरित आकृतिबंध एका आकर्षक अॅथलेटिक रचनेत समाविष्ट केले आहेत. जी एलिट टी-20 क्रिकेटसाठी तयार केली आहे. ज्यात आराम, गतिशीलता आणि मजबूत दृश्य ओळखींचा संगम आहे. प्रत्येक वेळी मैदानात उतरताना खेळाडूंना आपलेपणाची आणि उद्देशाची भावना मिळावी तसेच केवळ उत्तर प्रदेशचेच नव्हे तर भारतातील महिला क्रिकेटच्या व्यापक वाढीचे प्रतिनिधीत्व करता यावे, हा यामागे उद्देश आहे. ही जर्सी आगामी महिला प्रीमियर लीग हंगामातून यूपी वॉरियर्स संघ परिधान करेल आणि ती अधिकृत मर्चेंडाइज चॅनेलद्वारे चाहत्यांसाठी उपलब्ध असेल. यूर्पी वॅरियर्स 10 जानेवारी रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सशी भिडणार आहे. गेल्या हंगामात आठ सामन्यांत केवळ तीन विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी राहिलेला यूपी वॉरियर्स संघ 10 जानेवारीपासून गुजरात जायंट्सविरुद्ध आपल्या मोहीमेला प्रारंभ करेल.

महिला प्रीमियर लीग 2026 हंगामासाठी यूपी वॉरियर्स संघ : श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, मेग लॅनिंग, फोबी लिचफिल्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोभना, दियांद्रा डॉटिन, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, तारा नॉरिस, क्लो ट्रायॉन, सुमन मीना, जी. त्रिशा, प्रतीका रावल.

Advertisement
Tags :

.