टाटा कर्व्ह सिरीजअंतर्गत सुधारीत मॉडेल्सचे सादरीकरण
6 प्रकारात नव्या गाड्या सादर : सुरुवातीची किमत 10 लाखाच्या आत
वृत्तसंस्था, मुंबई
टाटा मोटर्सने आपली नवी कर्व्ह सिरीज एक्सअंतर्गतची एसयुव्ही बाजारात उतरवली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरुम किमत 10 लाख रुपयांच्या आत असणार असल्याचे समजते. टाटा मोटर्सने या नव्या सिरीजअंतर्गत विविध प्रकारात कार्स विविध किमतीना सादर केल्या आहेत.
नव्या कारमध्ये डिझाइन, आराम, तंत्रज्ञान व सुरक्षितता या गोष्टींना प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने स्मार्ट एक्स, प्युअर एक्स, प्युअर एक्स प्लस, क्रिएटीव्ह एक्स प्लस, अकंप्लीशड एक्स व अकंप्लीशड एक्स प्लस या नव्या प्रकारात गाड्या सादर केल्या आहेत. यामधील काहींना डार्क एडिशनमध्येही सादर केले आहे. स्मार्ट एक्सची किमत 9 लाख 99 हजार रुपये इतकी असेल. यात आरामदायी सिटस, आर 17 एरो शैलीचे व्हील्स, फ्लश डोअर हँडल व मल्टी ड्राइव्ह मोडसारखे वैशिष्ट्या देण्यात आले आहे. यात सुरक्षिततेसाठी 6एअरबॅग्ज असून, एलईडी हेडलॅम्प, डीआरएल व एलईडी टेल लॅम्प दिले आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व रिव्हर्स गाइड पार्किंग असिस्टसारख्या सुविधा मिळतील.
टाटा प्युअर एक्स या गाडीची किमत 10.99 लाख रुपये असणार असून 10.25 इंचाचा हर्मन अल्ट्रा व्ह्युव्ह इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कार प्लेचा समावेश यात असून व्रुझ कंट्रोल, स्मार्ट की, पॅसीव्ह एंट्री पॅसिव्ह स्टार्ट, 6 स्पीकर व फुल्ली ऑटोमेटीक टेंपरेचर कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांची जोड दिली जाणार आहे.
प्युअर एक्स प्लस या गाडीची किमत 11.79 लाख रुपये असणार आहे. यात प्लस लक्झ लेदरकेअर पॅक दिला आहे. ही गाडी डार्क एडिशनमध्येही उपलब्ध करण्यात आलीय.
टाटा क्रीएटीव्ही एक्स प्लस या गाडीची किमत 12.90 लाख रुपये असून यात व्हॉइस असिस्टेड पॅनारोमिक सनरुफ, आर18 डायमंड कट अलॉय व्हील्स व 360 डिग्री 3डी सराऊंड व्युव्ह कॅमेरा असेल. ऑटोमेटीक हेडलॅम्प, रेन सेन्सींग वायमर व इल्युमिनीटेड कुल्ड ग्लव बॉक्ससारख्या सुविधा यात असतील.