कै. वासुदेव परब यांनी दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य संस्मरणीय !
स्व. वासुदेव परब स्मृती स्थळासह अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
ओटवणे प्रतिनिधी
वासुदेव परब यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व क्रीडा क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले. आंबेगावचे देवदूत अशी ओळख निर्माण केलेले वासुदेव परब गोरगरिबांचेही कैवारी होते. गावाच्या विकासासाठी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासह सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे हे योगदान आंबेगाववासियांच्या कायम स्मरणात राहणार असून त्यांचे हे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असे प्रतिपादन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले.
आंबेगावचे माजी सरपंच स्व. वासुदेव आपा परब यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या स्मृती स्थळासह अर्धाकृती पुतळ्याच्या या अनावरण प्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती प्रमोद सावंत, कंझ्युमर्स सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, गुरू सावंत (बांदा), सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत, सचिव राजाराम सावंत, माजी जि प, सदस्य पंढरीनाथ राऊळ, देवस्थान मानकरी पंढरी राऊळ, चंदन धुरी (कोलगाव), विलास सावंत (डिंगणे), शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, माडखोल माजी सरपंच राजन राऊळ, माजी उपसरपंच जीजी राऊळ, मधुकर परब (केरवडे), माजी ग्रामसेवक मधुकर घाडी, सुजाता गावडे, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, वसंत गावडे, आपा मळीक, आनंद धुरी (मोरे), सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, माजी सरपंच नामदेव परब, प्रकाश केळुसकर, पपू सावंत, राजन मडवळ, संतोष राणे, योगेश गवळी, अण्णा केळुसकर, भिवाजी नाईक, पांडूरंग शिंदे, न्हानु राऊळ, संजय सावंत, बाळकृष्ण गवळी, आदी कै वासुदेव परब यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच आंबेगाव परिसरातील त्यांचे चाहते उपस्थित होते.कै वासुदेव परब यांच्या कार्याची आठवण म्हणून आणि त्यांच्या स्मृती कायम चिरंतर राहण्यासाठी परब कुटुंबीयांसह आंबेगाव वासीयानी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह स्मृतीसह स्मृतिस्थळ साकारले. यावेळी उपस्थित मान्यवरांसह ग्रामस्थांनीही कै. वासुदेव परब यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आंबेगावचे माजी सरपंच पांडुरंग आपा परब यांनी ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच आंबेगावचे २५ वर्षे सरपंचपद भुषविल्याबद्दल त्यांचा कै. वासुदेव परब मित्रमंडळातर्फे यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर प्रभू तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन आंबेगाव देवस्थान कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर परब यांनी केले.