For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अनटिल डान’ 25 एप्रिलला झळकणार

06:08 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘अनटिल डान’ 25 एप्रिलला झळकणार
Advertisement

डेव्हिड सँडबर्गकडून दिग्दर्शित चित्रपट

Advertisement

सोनी पिक्चर इंडियाचा आगामी हॉररपट अनटिल डानचा पहिला लुक समोर आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड एफ. सँडबर्ग यांनी केले आहे. चित्रपट प्लेस्टेशन स्टूडिओ व्हिडिओ गेमवर आधारित आहे.

चित्रपटाच्या पहिल्या झलकमध्ये भीतीदायक अन् थ्रिलरयुक्त नाट्यामय दृश्य दिसून येणार आहेत. ही कहाणी कालचक्रावर आधारित आहे. चित्रपट अनटिल डानला हॉरर थ्रिलरच्या थीमवर तयार करण्यात आले असल्याचे दिग्दर्शक सँडबर्ग यांनी सांगितले आहे.

Advertisement

हा चित्रपट भारतात 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. एका अजब चक्रव्यूहात फसलेल्या क्लोवर आणि त्याच्या मित्रांची ही कहाणी आहे. क्लोवर स्वत:च्या बहिणीच्या मृत्यूच्या रहस्याची उकल करण्यासाठी एका अशा ठिकाणी जातो, जेथे त्याला स्वत:च्या जिवंत असण्यावरूनच संशय वाटू लागतो. या चित्रपटात एला रुबिन, मायकल सिमिनो, ओडेसा एजियन, जी-यंग यू, बेलमोंट कॅमेली, मैया मिशेल, पीटर स्टॉर्मेयर हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित व्हिडिओ गेमच्या लाइव्ह अॅक्शनचे रुपांतरण आहे. चित्रपट एका सवाईकल गेमवर आधारित आहे. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. याची पटकथा गॅरी डॉबरमॅन यांनी लिहिली असून यात मूळ गेमचे कलाकार पीटर स्टॉर्मारे देखील दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.