मांगेलीत अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा मोठा फटका
12:13 PM Apr 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्या ; ग्रामस्थांची मागणी
Advertisement
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसाचा मोठा फटका मांगेली तळेवाडी,देऊळवाडी येथील ग्रामस्थांना बसला.यात चक्रीवादळाने येथील बऱ्याच घरांच्या छप्परांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठमोठी झाडे,केळींची झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी,दोडामार्ग तहसीलदार कार्यालय यांना माहिती दिली असून नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मांगेली तळेवाडी,देऊळवाडी,फसणवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
Advertisement
Advertisement