For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवकाळी पावसाचा जोंधळा पिकाला फटका, शेतकरी चिंताग्रस्त

12:09 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अवकाळी पावसाचा जोंधळा पिकाला फटका  शेतकरी चिंताग्रस्त
Advertisement

कापून ठेवलेले जोंधळा पीक पावसामुळे भिजून खराब

Advertisement

किणये : गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जोंधळा पिकाचे नुकसान झाले आहे. शिवारात कापून ठेवलेला जोंधळा खराब झाला आहे. त्यामुळे या अवकाळीचा फटका जोंधळा पिकाला बसला आहे. अवकाळी पावसामुळे जोंधळ्याची कणसे खराब झाली. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तसेच काही शेतकऱ्यांनी शेतातील जोंधळा कापून ठेवला होता, तोही पावसामुळे भिजला. जोंधळा पिकाची कणसे काढून उर्वरित असलेला जोंधळा कडबा म्हणून जनावरांसाठी उपयोग करतात. बहुतांशी शेतकऱ्यांनी जोंधळ्याची कापणी करून शिवारात ठेवलेला जोंधळा पावसामुळे भिजला. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्नही काही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षी जोंधळा पिकाचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेली जोंधळ्याची कणसे खराब झाली. जोंधळ्याची कापणी करून त्याला वाळवून नंतर जनावरांना घालण्यात येतो. मात्र कापून ठेवलेला शिवारातील जोंधळा पावसामुळे भिजल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.