दोडामार्गात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
दोडामार्ग – वार्ताहर (छाया – समीर ठाकूर)
गेले दोन-तीन दिवस जाणवणाऱ्या उकाड्यानंतर आज दुपारी साधारणता सव्वादोनच्या सुमारास जोरदार पावसाने संपूर्ण दोडामार्ग शहराला अक्षरशः झोडपून काढले. मोठ्या मेघगर्जनेसह आलेल्या या पावसामुळे दोडामार्ग शहरात अक्षरशः सर्वांचीच तारांबळ उडाली.कोकण किनारपट्टीसहित राज्याला देखील येत्या दोन-चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोडामार्ग शहर परिसरात गेले काही दिवस अतिशय उष्मा वाढला होता. त्याचबरोबर कधीकधी हवामानाचा बदल जाणवत होता. आज मंगळवार दुपारी दोन ते सव्वादोन च्या सुमारास संपूर्ण दोडामार्ग शहराला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहर परिसरात मोठ्या वीजगर्जनेसह हा पाऊस बरसला. यामुळे दुपारची वेळी घरी जाणाऱ्यांची बरीच तारांबळ उडाली. त्यात लग्न सराईत सुरू असल्याने अनेक वराड मंडळींचीही बरीच तारांबळ उडाली आहे. त्याशिवाय अचानक बरसलेल्या पावसामुळे बरेच जण जवळपास दोन तास अडकून पडले होते.