For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | सोलापूर ग्रामीण भागात अवकाळीचा तडाखा; महावितरणच्या 'अतिदक्षते'मुळे नागरिकांचे हाल

04:45 PM Apr 27, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापूर ग्रामीण भागात अवकाळीचा तडाखा  महावितरणच्या  अतिदक्षते मुळे नागरिकांचे हाल
Advertisement

                   सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठा आणि दळणवळण विस्कळीत

Advertisement

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातगेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठा व दळणावर विपरीत परिणाम होत आहे. ऐन उन्हाळयात विजेअभावी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी ५मे पासून अवकाळी पाऊस सुरु झाला होता. यंदा ५ एप्रिल पासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरु आहे. वादळी वारा अन् विजांच्या कडकडाट होत खबरदारी घेत असल्याने
या महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत आहे. काळात मागील आठवड्यात सलग चार दिवस रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. वीजपुरवठा १४ न तासापेक्षाही जास्त काळ खंडित झाल्याने या काळात अनेक गावातील पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला. - विजेअभावी पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने महिला व मुलांनामिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणण्याची नामुष्की ओढावली. विजेअभावी अनेक गावातील पिठाच्या गिरणीही बंद होत्या. त्यामुळे मागील काही दिवसात अनेक ठिकाणी गहू व ज्वारीचे दळण होणे बंद पडले.

Advertisement

त्यामुळेमहावितरणकडून दक्षतेचा अतिरेकअवकाळी वादळी वारा सुरु झाला की लगेच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा हा भाग असला तरी वादळी वारा थांबल्यानंतरही वीजपुरवठा अनेक तास खंडित असतो. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणने काळजी घ्यावी, मात्र त्याचा अतिरेक करु नये सचिन शेळगे, बोरामणीअनेक महिलांना पिठासाठी शेजारणीकडे उधारवारी करावी लागली. एकीकडे रोजच सोलापूरचे तापमान वाढत आहे. अशात ग्रामीण भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने उष्ण दाहकतेने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या आणखीनच वाढत आहे.

शेतातपिकांना पाणी देण्यासाठी गेलो तर वीज नाही, अन गावात घरी आलो की वीज नाही अशी अवस्था ग्रामीण भागात सध्या अनुभवास येत आहे. विजेअभावी घरातील टीव्ही, कुलर, पंखाडी बंद असल्याने अनेकांना ऐन उन्हाळ्यात घराबाहेर सक्तीने बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

Advertisement
Tags :

.