कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजधानीत शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह

01:19 PM Feb 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

सातारा जिह्यात रात्री 12 वाजल्यापासूनच विविध गडकोटावर शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी शिवजयंतीनिमित्ताने शिवज्योत आणून वातावरण शिवमय करण्यात आले होते. किल्ले अजिंक्यतारा, वैराटगड, प्रतापगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, आदी गडकिल्ले शिवभक्तांच्या घोषणांनी रात्रीच दुमदूमून गेले होते. सकाळपासून राजधानी साताऱ्यात जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात मिरवणुका निघत होत्या. सायंकाळी 7 वाजता मुख्य शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभा यात्रेत उंट, घोटे, चित्ररथ आणि केरळ येथील वाद्य लक्ष वेधून घेत होते. खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. त्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

सातारा जिह्यात शिवजयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव मंडळांच्यावतीने विविध गडकिल्यावरुन शिवज्योती आणून शिवजयंती साजरी करण्यात आली होती. जिह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यासह सर्वच गडकिल्यांची प्रवेशद्वारे झेंडूच्या फुलांनी शिवभक्तांनी सजवली होती. प्रतापगडावर सातारा जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने शिवजयंती साजरी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते सर्व विधीवत कार्यक्रम पार पडले. या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी विश्वास सिद्द, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर राजधानी साताऱ्यात सकाळपासून विविध मंडळांनी आपल्या मिरवणूका काढल्या. काही मंडळांनी दुचाकीवरुन रॅली काढुन शिवतीर्थ येथे समारोप केला. तसेच शिवभक्त व सातारकरांनी सकाळीच उठून छ. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवतीर्थ येथे गर्दी केली होती. तेथे सामाजिक संघटना, सातारा नगरपालिका यांच्यावतीने येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती. शिवभक्तांनी दांडपट्याचे खेळही त्या परिसरात करुन लक्ष वेधून घेतले. अनेक सातारकरांनी पारंपारिक वेश परिधान केले होते. अजिंक्यताऱ्यावरही अनेक शिवभक्त जावून राजसदरेवर नतमस्तक झाले. तेथे पूजन करुन शिवज्योत आणली. साताऱ्यात प्रत्येक चौकात शिवज्योती आणली होती. त्यामध्ये मोती चौकात भव्य अशी शिवप्रतिमा लक्ष वेधून घेत होती. जय हिंद मंडळाने सोनेरी रंगाची शिवमूर्तीची पूजा केली होती. ती लक्ष वेधून घेत होती. पंताच्या गोटात पावन हनुमान मंदिरासमोर शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या हस्ते शिवमूर्तीची पूजा करण्यात आली. शिवजयंतीच्या सोहळयामध्ये बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सातारा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

राजधानी साताऱ्यात शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. त्या शोभा यात्रेची सुरुवात सायंकाळी 7 वाजता राजवाडा येथील गांधी मैदानापासून करण्यात आली. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, राजू गोरे, रवी माने, भालचंद्र निकम, सचिन कांबळे यांच्यासह मान्यवर सहभागी झालेले होते. सर्वच सातारकर पांरपारिक पोशाखात सहभागी झालेले होते. केरळ राज्यातील 100 कलाकरांनी वाद्यासह लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर गजीनृत्यानेही सातारकरांच्या नजरा खिळवून ठेवल्या. ढोल ताशा पथक, हलगी वादनाने स्फुर्ती चेतवली गेली. तुतारीच्या निनादाने रंगत आणली गेली. या मिरवणुकीमध्ये उंटावर आणि घोड्यावर पारंपारिक वेशात सहभागी झालेल्या महिला, युवती, तसेच बालशिवाजी हे आकर्षित ठरत होते. ही शोभायात्रा मोती चौक मार्गे शिवतीर्थ येथे पोहचली. शिवतीर्थावर छ. शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणखी उत्साह वाढला.

येथील छ. शिवाजी महाराज संग्रालयात जय शिवाजी जय भारत रॅली पोहचली. तेव्हा त्या रॅलीचे स्वागत संग्रहालयाच्यावतीने अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी केले. संग्रालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिव प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गंलाडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वनरक्षक अदिती भारद्वाज, प्रांत अधिकारी अशिष बारकुल, मुख्याधिकारी अभिजीत बापट, तहसिलदार नागेश गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तारळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवतीर्थ येथे भव्य मिरवणूक पोहचल्यानंतर रात्री 9 वाजता खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे या दोघांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी सातारकर मोठया संख्येने सहभागी झालेले होते.

राजधानी साताऱ्यात रात्री उशिरा आकर्षक अशी आतषबाजी शिवतीर्थ येथे करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी काहींनी चार भेंत गाठली होती. तेथून अनोखा आतषबाजीचा नजराणा पहायला मिळत होता.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article