For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्सुली गावच्या उपसरपंचपदी वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड

05:41 PM Aug 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
इन्सुली गावच्या उपसरपंचपदी वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
इन्सुली गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करेन, तसेच गावातील महिलांसाठी रोजगाराभिमुख योजना गावात कशा राबवता येईल याकडे लक्ष देईन. मी उपसरपंच म्हणून काम करत असताना पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवुन सर्वाना एकत्र घेऊन गावच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविन. गावातील रस्त्यांचा प्रश्न, विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन तसेच शासनाच्या विविध योजना मी सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचवेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच सौ वर्षा सावंत यांनी इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयात केले. आजच त्यांची इन्सुली गावच्या उपसरपंचपदी निवड झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, कास सरपंच प्रवीण पंडित , निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत, माजी सभापती गुरूनाथ पेडणेकर, मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्या नमिता नाईक, राधिका सावंत, स्वागत नाटेकर, दत्ता खडपकर, माजी सरपंच अश्विनी परब, नाना पेडणेकर, पूजा पेडणेकर, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, काका चराटकर, ज्ञानेश्वर राणे, आदि उपस्थित होते.उपसरपंच कृष्णा सावंत यांनी पक्षीय धोरणनुसार राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आज उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी नामनिर्देशन दाखल करताना सौ वर्षा सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. विरोधकांकाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने श्री सावंत यांची बिनविरोध निवड झाली. सौ सावंत हे डोबाशेळ, क्षेत्रफळ, कोठावळेबांध व माडभाकर प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ज्ञानदेव चव्हाण यांनी काम पाहिले.यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अजय कोठावळे, सचिन दळवी, राजन गावडे, नितीन राऊळ, महेंद्र सावंत, अजय सावंत, महेंद्र पालव, संजय पालव, उमेश पेडणेकर, महेश धुरी , औदुंबर पालव , दादा परब, स्वामी पेडणेकर, जयराम पालव, सुर्या पालव, रामा पालव, उमेश परब, मयुर परब, प्रदीप सावंत, अश्विनी परब,सुषमा पालव, प्रभाकर धुरी,आदी सह इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.