For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Breaking | चरेगाव येथे देवतांच्या मुर्तीची अज्ञाताकडून तोडफोड ; गावात तणावाचे वातावरण

05:34 PM Apr 02, 2026 IST | NEETA POTDAR
karad breaking   चरेगाव येथे देवतांच्या मुर्तीची अज्ञाताकडून तोडफोड   गावात तणावाचे वातावरण
Advertisement

                   कराड तालुक्यात मंदिरातील मूर्तींची तोडफोड; संतापाची लाट

Advertisement

कराड - कराड तालुक्यातील चरेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चरेगावमधील श्रीराम मंदिरातील देवांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे. राम लक्ष्मण व सिता यांच्या मुर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. हनुमान जयंती दिवशीच घडलेल्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तत्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी मंदिर परिसर ताब्यात घेत दरवाजा बंद करून तपासाची प्रक्रिया सुरू केली. यावेळी ठसे तज्ञ, श्वान पथक तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पंचनामा करून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या मूर्ती पोलीसांनी ताब्यात घेतल्या.

Advertisement

दरम्यान पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकानेही तपास सुरू केला आहे.

Advertisement
Tags :

.