For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अज्ञातांनी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या 15 चारचाकी फोडल्या; आजऱ्यातील प्रकार

01:39 PM Dec 26, 2023 IST | Abhijeet Khandekar
अज्ञातांनी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या 15 चारचाकी फोडल्या  आजऱ्यातील प्रकार

आजरा प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील पूर्व भागातील सरोळी, निंगुडगे व गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर येथील रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या 15 चारचाकी गाड्या अज्ञातांना रात्रीच्यावेळी तोडफोड करत फोडल्या.

Advertisement

रस्त्याकडेला असणाऱ्या या गाड्यांची तोडफोड करत काचांचा चक्काचुर केला आहे. यामध्ये ऐनापूर येथील सुनील कुराडे, राजू कडाकने, सदाशिव कागवाडे तर सरोळी येथील डॉ. विजय पाटील, बाळासाहेब पोवार, रमेश देसाई, एस. आर. पाटील, निगुंडगे येथील बाळू बोलके, महेश देसाई यांच्या गाड्यांचे नुकसान केले आहे. यावेळी आजरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Advertisement
Advertisement
×

.