For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

11:01 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार
Advertisement

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगर ब्रिजनजिक अपघात

Advertisement

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने अनोळखी इसम ठार झाल्याची घटना सोमवार दि. 14 रोजी मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास श्रीनगर ब्रिजनजिक घडली आहे. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने वाहनासह पलायन केले असून आपघाताची माहिती समजताच उत्तर रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठार झालेल्या इसमाचीदेखील ओळख पटली नसल्याने पोलिसांनी मृतदेह जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवला आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे. मयत इसमाचे वय 40 ते 45 असून, उंची 5 फूट 2 इंच, मध्यम बांधा, लांब चेहरा, सरळ नाक, गव्हाळी वर्ण, डोक्यावर तीन इंच लांब काळे व पांढरे केस, लहानशी मिशी, उजव्या हातावर ड्रॅगन आणि हनुमान चित्राचे टॅटू आहे.

अंगावर निळ्या रंगाचा फूल टी शर्ट, आणि राखाडी रंगाची पँट परिधान केली आहे. वरील वर्णनातील इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी 08312405233 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास अनोळखी इसम श्रीनगर ब्रिजनजिक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होता. त्यावेळी काकतीकडून हलग्याकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती समजताच उत्तर रहदारी पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले असून मृतदेह जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवला आहे. त्याचबरोबर अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करून वाहनाचाही शोध सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.