विद्यापीठाचा पुरुष फुटबॉल संघ आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना
विद्यापीठ प्रशासनाकडून खेळाडूंचे अभिनंदन
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाचा पुरुष फुटबॉल संघ आज वडोदरा ( गुजरात) येथे होणार्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना झाला. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव मधे प्रथम तसेच पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत उपविजेते पद पटकावून ऑल इंडिया खेलो इंडिया स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले होते. सदरच्या संघामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा समावेश आहे. संघाला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे यांनी प्रोत्साहन दिले.
यावेळी क्रीडा विभागाचे संचालक डॉ . शरद बनसोडे ,श्री. अमर सासने व डॉ.अभिजित वणिरे हे उपस्थित होते. संघाच्या कर्णधारपदी प्रभू पोवार तर उपकर्णधारपदी आरबाज पेंढारी यांची निवड करण्यात आली.
संघात सहभागी खेळाडू
जयकुमार मेथे - गोलकिपर, विशाल पाटील, दर्शन पाटील, खुर्शीद अली, सिध्देश साळोखे, देवराज मंडलिक,(सर्व न्यू कॉलेज), अनिल जानकर (गोलकिपर),आरबाज पेंढारी, ओंकार लायकर, अदित्य लायकर, संकेत जरग, हर्ष जरग, साहिल डाकवे (सर्व स. ब. खाडे कॉलेज, कोपार्डे) प्रभू पोवार, शोएब बागवान, रोहित पोवार, गुरुराज काटकर, यश देवणे (सर्व शहाजी कॉलेज), गणेश जगताप, ओंकार शिर्के (रहिमतपूर), शुभम देसाई( नरके कॉलेज), कुपिंदर पोवार ( शिवराज कॉलेज, गडहिंग्लज) प्रशिक्षक- अमर सासने, सहा. प्रशिक्षक - डॉ . अभिजित वणिरे यांचा समावेश आहे.