युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका : रंजक इतिहास आणि प्रेरक वर्तमान
जगातील सर्वात बलाढ्या देश मानला जाणारा अमेरिका देशही ब्रिटनचा गुलाम होता, हे अनेकांना माहीत नसेल. आज अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. अमेरिकेला महासत्ता असंही म्हटलं जातं. पण अमेरिका देखील इंग्रजांची गुलाम होती. भारताप्रमाणेच या देशातील जनतेवरही इंग्रजांनी अत्याचार केले. मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेला 4 जुलै 1776 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. यंदा अमेरिकेने आपला 250 वा स्वातंत्र्य दिन चार जुलै रोजी मोठ्या दिमाखात, अतिशय धुमधडाक्यात साजरा केला.
अमेरिका (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) हा जगातील सर्वात प्रभावशाली देश आहे, ज्याचा इतिहास 1492 पासून कोलंबसच्या प्रवासापासून सुरू होतो आणि आजपर्यंत चालू आहे. हा इतिहास स्वदेशी अमेरिकन संस्कृती, युरोपियन वसाहत, क्रांती, गृहयुद्ध, औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, नागरी हक्क चळवळ आणि आधुनिक आव्हाने यांचा समावेश करतो. अमेरिकेच्या इतिहासात 13 वसाहतींनी ब्रिटनविरुद्ध स्वातंत्र्य लढा दिला, संविधान तयार केले, गृहयुद्धात गुलामगिरी संपवली, दोन महायुद्धांत विजयी झाले, कोल्ड वॉर जिंकले आणि 9/11 नंतर दहशतवादाविरुद्ध लढले. हा इतिहास लोकशाही, नवकल्पना यांची अत्यंत रंजक आणि प्रेरक अशी ही कथा आहे.
अमेरिकन क्रांती (1775-1783)
अमेरिकेत ब्रिटनच्या 13 वसाहती होत्या. 1776 पूर्वी, सर्व वसाहतींना साखर,
कॉफी, चहा किंवा स्पिरिट सारख्या वस्तूंच्या आयातीसाठी उच्च शुल्क द्यावं लागत होतं. इंग्रजांनी अमेरिकन जनतेवर अत्याचार केले. यामुळे ब्रिटिश राजवटीबद्दल असंतोष वाढला. 18 व्या शतकाच्या 1775 मध्ये युद्धकाळ सुरू झाला आणि 1776 मध्ये वसाहतींना स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता जाहीर करणारी स्वतंत्रतेची घोषणा स्वीकारण्यात आली. स्वातंत्र्याचे युद्ध 1783 पर्यंत सुरू राहिले जेव्हा ब्रिटनने यूएसएच्या स्वतंत्रतेला मान्यता दिली. हा काळ नवीन राष्ट्राचे निर्माण आणि त्याच्या तत्त्वांची पायाभरणी करण्यासाठी आधार बनला. उत्तर आणि दक्षिण यांच्यातील सिव्हिल वॉर 1861 मध्ये सुरू झाले आणि हे गुलामगिरी आणि राज्यांचे हक्क यांवरच्या संघर्षाचे परिणाम होते. उत्तर, जो गुलामांना मुक्त करण्यास समर्थन देत होता, दक्षिण त्याला विरोध करत होता, जो गुलामगिरीच्या संस्थेच्या टिकावावर जोर देत होता. युद्ध 1865 मध्ये उत्तरच्या विजयाने संपले. संविधानाच्या 13 व्या सुधारण्याच्या स्वीकृतीने यूएसएमध्ये गुलामगिरीचा अंत झाला.
फ्रान्सकडून अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट
फ्रान्सने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिला होता. 4 जुलै 1776 रोजी संयुक्त राज्य अमेरिकेला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला ही भेट दिली होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचं प्रतिक मानलं जातं. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा अर्थ स्वातंत्र्याचा पुतळा असा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सुमारे 150 वर्ष जुना आहे. 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.
अमेरिका आपल्या आकाराप्रमाणे, आपल्या लष्करी शक्तीमुळे आणि आपल्या करार व स्थानांच्या जागतिक व्यवस्थेमुळे शक्तिशाली आहे. हे नक्कीच महत्त्वाचे आहे. पण फक्त ह्यामुळेच ते महाशक्ती नाहीत. वैज्ञानिक संशोधनातही अमेरिकेला जबरदस्त आघाडी आहे, जी त्याच्या तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीला जगातील इतर देशांपेक्षा खूप पुढे नेते. जगाच्या आर्थिक व्यवस्थेत अमेरिकेला एक मध्यवर्ती स्थान आहे. अमेरिकेच्या स्थापनेला 250 वर्षे पूर्ण होत असताना, भारतीय गुंतवणूकदारांसाठी अमेरिका केवळ एक बाह्य घटक नाही, तर बाजारातील भावना, चलनाची स्थिरता आणि कॉर्पोरेट नवोपक्रमांसाठी एक प्रमुख चालक आहे. अमेरिकेचे विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील योगदान पाहता असे लक्षात येते की 1901 ते 2025 पर्यंत नोबेल पुरस्कारांमध्ये अमेरिकेची जोरदार प्रगती राहिली आहे. अमेरिकेने 381 नोबेल जिंकले आहेत आणि त्यापैकी बहुतेक विज्ञान क्षेत्रात आहेत. अमेरिकेत जगाच्या लोकसंख्येचा फक्त 4 टक्के हिस्सा आहे, पण त्याच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची संख्या 34 टक्के आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यवस्था बदलली आहे. गेल्या ऐंशी वर्षांपासून कोणताही देश अमेरिकेला तिच्या पहिल्या स्थानापासून हटवू शकलेला नाही. अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे चलन ‘डॉलर’ हे जागतिक वित्त व्यवस्थेचा कणा आहे. नवतंत्रज्ञान निर्मितीत जगात अग्रेसर आहे. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिका जागतिक पातळीवर ‘अढळपदावर’ आहे आणि आजही त्याच पदावर कायम आहे. यावरून अमेरिका का ‘ग्रेट’ आहे हे लक्षांत येते.
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागलेली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील 13 राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे पसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चिनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून अमेरिका उदयास आली. याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धीने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्नधान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस, तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकेची भरभराट होऊ लागली.
अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्या मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात जगात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्राrय सुधारणांचा अंगिकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वत:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच 20व्या आणि 21व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक